स्वस्तातला टीपकागद करून देईल लाखोंची कमाई

काही वस्तूंचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तर सरकारकडून मदतही मिळते. यापैकीच एक म्हणजे टीपकागद.
tissue paper factory
tissue paper factorygoogle
Updated on

मुंबई : प्रत्येकाला कधी ना कधी व्यवसाय करून बघायचाच असतो; मात्र कधी पैसे कमी पडतात तर, कधी कल्पनाशक्ती कमी पडते. आपल्या दैनंदिन आयुष्याचा विचार केला तर पावलोपावली अशा अनेक कल्पना व्यवसायासाठी सापडतील ज्या फारशा खर्चिकही नाहीत आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देऊ शकतात. काही वस्तूंचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तर सरकारकडून मदतही मिळते. यापैकीच एक म्हणजे टीपकागद (tissue paper).

युरोपीय देशांसारख्या थंड प्रदेशांमध्ये टीपकागदाला सर्वाधिक मागणी आहे. करोना संसर्गाच्या वाढत्या प्रसारादरम्यान जेव्हा युरोपीय देशांमध्ये टाळेबंदी जाहीर झाली तेव्हा भारतीयांप्रमाणे युरोपीय नागरिकांनीसुद्धा जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली. यावेळी त्यांनी सर्वाधिक खरेदी केलेली वस्तू म्हणजे किराणा सामान नव्हे तर टीपकागद होय. एक-दोन दिवसांतच दुकानांमधून टीपकागदाचा माल संपला होता.

भारतात टीपकागदाचा खप युरोपीय देशांइतका नाही; मात्र तरीही या वस्तूला येथे चांगली मागणी आहे. ही मागणी वाढतानाही दिसत आहे. भारतीय बाजारात ब्रॅण्डेड वस्तूंइतक्याच स्थानिक उत्पादनांनाही चांगला वाव आहे. त्यामुळे टीपकागदाचा कारखाना सुरू करून जवळपासच्या परिसरात त्याची विक्री करणे हा नफ्यातला उद्योग होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या टीपकागदाचा उद्योग कसा सुरू केला जाऊ शकतो...

tissue paper factory
सौंदर्यखणी : ग्लॅमरस ‘टिश्यू’ साडी

टीपकागद बनवण्याचे यंत्र ५ लाख रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहे. या यंत्रामधून चार ते पाच इंचांचे १०० ते ५०० टीपकागद तयार होतात. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही १० ते ११ लाखांचे मोठे यंत्रही खरेदी करू शकता. यातून एकावेळी अडीच हजार टीपकागद तयार होतात.

tissue paper factory
विमानाच्या शौचालयातील टिश्यू पेपरखाली लपवलं होतं लाखोंचं सोनं, अधिकारी निघालेत वरचढ आणि हातात पडल्यात बेड्या

मुद्रा कर्ज योजना

या व्यवसायासाठी तुम्ही स्वत: साडे तीन लाख रुपये गोळा करू शकलात तर मुद्रा योजनेतून तुम्हाला कर्ज मिळू शकते. एवढे पैसे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ३.१० लाख टर्म लोन आणि ५.३० लाख वर्किंग कॅपिटल लोन मिळू शकते. अशाप्रकारे १२ लाख रुपये जमा झाल्यानंतर तुम्ही सहजपणे व्यवसाय सुरू करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.