Fashion Tips : लॉन्ग लास्टिंग मेकअपसाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

मेकअप दीर्घकाळ कसा टिकवायचा, असा प्रश्न अनेक वेळा महिलांसमोर उभा राहतो.
makeup tips
makeup tipssakal
Updated on

सणांचा सीझन सुरू झाला असून नुकतेच घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाले. आता काही दिवसावर नवरात्रोत्सव आला आहे. सण म्हणजे गृहिणींच्या मिरवण्याचा काळ. उत्कृष्ट दागिन्यांसह सुंदर साडी आणि त्यावर चांगला मेकअप असेल तर स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलते. मेकअप दीर्घकाळ कसा टिकवायचा, असा प्रश्न अनेक वेळा महिलांसमोर उभा राहतो.

कोणत्या खास प्रसंगी मेकअप कसा करायचा?. अगदीच घाईघाईत तयार होताना कमी वेळेत छान तयार व्हायला कोणाला आवडणार नाही. म्हणूनच लॉन्ग लास्टिंग (long lasting) मेकअपसाठी काही टिप्स पाहुयात... (how to stick makeup long lasting check here tips)

makeup tips
Eye Makeup: लेन्स लावल्यानंतर असा करा डोळ्यांचा मेकअप

मेकअपसाठी चेहरा करा तयार

सणासुदीच्या निमित्ताने सर्वच महिला थोडा का होईना मेकअप करतातच. पण डायरेक्ट मेकअप चेहऱ्यावर करू नये. आपण प्रथम आपल्या त्वचेवर बर्फ वापरला लावा. चेहरा बर्फाने घासून घ्या. यानंतर चेहऱ्याला मेकअप करा. यामुळे मेकअप सेट होण्यास मदत होते.

असा करा मेकअप

चेहऱ्याला रचना देण्यासाठी कॉन्टूरिंग (Contouring) करा. यानंतर मेकअप बेस सेट करण्यासाठी ट्रांसपेरेंट (transparent) पावडर वापरा. आता मेकअप फिक्सर लावा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकेल.

makeup tips
ऑईली स्किनवर 'असा' टिकवा Long Lasting Makeup

तेलकट त्वचेसाठी टिप्स

रात्री झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप उतरवला पाहिजे. जर तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर नसेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून चोळा. यानंतर फेसवॉशने चेहरा वॉश करा आणि मॉइश्चरायझर लावा.

कोरड्या त्वचेसाठी मेकअप

तुमची त्वचा कोरडी असेल तर मेकअप करण्यापूर्वी थोडे व्हॅसलीन लावा. तुम्ही व्हिटॅमिन-ई कॅप्सूल किंवा मॉइश्चरायझर्स देखील वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा कोरडी होणार नाही.

लिपस्टिकने लावा आयशॅडो

डोळ्यांच्या मेकअपवरही विशेष लक्ष दिले पाहिजे. मेकअपमध्ये आयशॅडो नक्की लावा. यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडेल. लिपस्टिकचा वापर आयशॅडो म्हणूनही होऊ शकतो. यासाठी बोटावर लिपस्टिक घेऊन डोळ्यांवर हलकेच लावा. त्यानंतर डोळ्यावर मस्करा लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.