पावसाळ्यात धान्याला कीड लागू नये म्हणून काय करावे..?

पावसाळ्यात धान्यांला कीड लागू नये म्हणून काय करावे..? जाणून घ्या या सोप्या टिप्स
Grains
Grainssakal
Updated on

आता पावसाळा तोंडावर आलाय घरातील किचन सांभाळण्याऱ्या प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न पडला असल की पावसाळ्यात धान्यांला कीड लागू नये म्हणून काय करावे..? याच प्रश्नाच उत्तर खास टिप्सच्या स्वरुपात आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. (how to store grain for long time)

Grains
ब्रेकअपनंतरही प्रेयसीशी करु शकता पॅचअप; लक्षात ठेवा 'या' गोष्टी

1. जर तुम्हाला पावसाळ्यात घरात धान्य साठवायचे असेल तर खरेदी करतानाच चांगल्या दर्जाचे धान्य खरेदी करा. जेणेकरून ते धान्य बऱ्याच दिवस टिकु शकेल.

2. धान्य घरात आणल्यानंतर ते ओलाव्यापासुन दुर ठेवा. तुम्ही जर का धान्य डब्बा अथवा कोठीत भरुन ठेवणार असाल तर ते एकदा कडक उन्हात वाळवुन मगच त्यात धान्य भरा.

3. बऱ्याच वेळा आपल्याला सोबत अस होत की, घरामध्ये साठवलेल्या धान्याला बुरशी किंवा किडे होतात. ही समस्या बदलत्या हवामानामुळे देखील होते. काही लोक यासाठी कीटकनाशके देखील वापरतात. परंतु याचा उपयोग करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. किटकनाशकाऐवजी तुम्ही धान्य लवंग किंवा तेजपान टाकु शकता.

Grains
भारत-चीन सीमा प्रतिबंधित क्षेत्रात बांधलयं घर, महिला स्वत:ला देवी पार्वती समजते

4. तुर, हरबरा, उदीड ,मुग आदी डाळीमध्ये काही वाळलेली कडुनिंबाची टाकु शकता किंवा डाळींना मोहरीचे देखील घालू शकता. तेल लावल्यानंतर डाळीना एकदा उन्हात चांगले वाळवायचे आणि नंतर मग कंटेनरमध्ये भरुन ठेवा यामुळे आपली डाळ बऱ्याच कालावधीपर्यंत टिकू शकते.

5. काही जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील लसूण धान्यां मध्ये टाकु शकता.लसणामुळेदेखील धान्यांना कीड लागत नाही. त्यासाठी लसणाची सालं न काढता एक संपूर्ण गाठा धान्यामध्ये टाकावी.

6. लसुन ,लवंग किंवा कडुलिंब पाने टाकतांना फक्त एकच खबरदारी घ्यावी

7. आधी डबा चांगला पुसून घ्यावा नंतर डब्यात धान्य टाकावे त्यावर मग तुमच्या सोईनुसार लसून, लवंग जे उपलब्ध असेल ते टाकावे आणि त्यावर पुन्हा धान्य टाकले असे थरावर थर चढवुन डब्यात धान्याची साठवून करावी . त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. तसंच डब्याचं झाकन उघडल्या नंतर ते पुन्हा हवा बंद असावं याकडे निट लक्ष दयावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()