Garlic Kitchen Hacks : सोललेला लसूण महिनाभर खराब होणार नाही, स्टोर करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

तुम्ही या टिप्स फॉलो करुन सोललेला लसूण अनेक महिने ताजा ठेवू शकता.
Garlic Kitchen Hacks : सोललेला लसूण महिनाभर खराब होणार नाही, स्टोर करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
Updated on

भारतीय स्वयंपाकघरामध्ये लसणाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. डाळीला फोडणी देणे असो वा भाजीमध्ये मसाला तयार करण्यासाठी असो लसणाचा स्वाद आणि सुगंध दोन्हीची गरज भासते. मात्र लसूण सोलण्यासाठी खूप वेळ जातो आणि कंटाळाही येतो. अनेक वेळा घाईमुळे जेवणात लसूण वगळावे लागते.

अशा स्थितीत जर तुम्ही जर लसूण सोलून आधीच स्टोर करून ठेवले तर तुम्ही लसूण महिनाभर वापरू शकता. अनेक महिला बाजारातून सोललेला लसूण विकत घेतात. पण, त्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे बाजारातून घरी आणल्यानंतर लसूण लवकर खराब होऊ लागतो. सोललेला लसूण खराब होऊ नये आणि बराच काळ साठवून ठेवायचा असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

Garlic Kitchen Hacks : सोललेला लसूण महिनाभर खराब होणार नाही, स्टोर करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
Kitchen Hacks: भाजीत चुकून तिखट जास्त पडलं? टेन्शन घेऊ नका, या ट्रीक्स करा फॉलो

अशा प्रकारे सोललेला लसूण स्टोर करा

  • सोललेला लसूण जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून चांगल्या क्वालिटीचा लसूण विकत घ्यावा लागेल, लसूण पूर्णपणे ताजे असावे हे लक्षात ठेवा.

  • आता सर्व लसूण सोलून बाजूला ठेवा. यानंतर सोललेला लसूण सुती कापडावर ठेवा आणि दिवसभर उन्हात वाळवा. हे वरील ओलावा काढून टाकेल.

  • त्यानंतर, सर्व लसूण टिश्यू पेपरवर ठेवा आणि पुसून घ्या, जेणेकरून उर्वरित ओलावा त्यातून निघून जाईल.

  • आता स्वच्छ काचेची बरणी घ्या. टिश्यू पेपर बरणीच्या तळाशी पसरवा. नंतर त्यात सोललेले लसूण ठेवा.

  • यानंतर, एयर टाइट झाकण लावून बरणी बंद करा, जेणेकरून बाहेरची हवा आत जाणार नाही.

  • आता ही बरणी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. असे केल्याने सोललेला लसूण महिनाभर खराब होणार नाही आणि ताजाही राहील.

  • जेव्हा तुम्हाला हवे असेल तेव्हा तुम्ही ते सहजपणे बाहेर काढू शकता आणि भाज्या किंवा कोणत्याही डिशमध्ये घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.