'या' पद्धतीने पुदिना स्टोर केला तर टिकेल महिनाभर

पुदिना खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' ट्रीक्स
'या' पद्धतीने पुदिना स्टोर केला तर टिकेल महिनाभर
Updated on

पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा पालेभाज्या फार काळ टिकत नाही. त्या लवकर खराब होतात. त्यामुळे या दिवसांमध्ये भाज्या कशा प्रकारे स्टोर कराव्यात हा प्रश्न कायमच गृहिणींपुढे असतो. त्यातच कोथिंबीर व पुदिना सुद्धा लवकर खराब होतो. विशेष म्हणजे कोथिंबीर व पुदिना खराब झाल्यावर त्यांचा कुबट वाट संपूर्ण फ्रीज आणि घरात पसरतो. म्हणूनच, पावसाळ्यात पुदिना कशाप्रकारे स्टोर करायचा ते पाहुयात. (how to store pudina aka mint for long time)

१. शक्यतो मुळं असलेला पुदिनाच खरेदी करावा. त्यानंतर घरी आल्यावर पुदिन्याच्या मुळांवर असलेली माती स्वच्छ धुवावी.

'या' पद्धतीने पुदिना स्टोर केला तर टिकेल महिनाभर
SolKadhi recipe : मालवणी स्टाइल सोलकढी

२. पुदिना आठवडाभर टिकवण्यासाठी त्याची मुळे पाण्यात ठेवावीत. ( पाणी खराब झाल्यास बदलत रहावं.)

३. शक्यतो पुदिन्याची मुळं व देठ काढून केवळ पानंच स्टोर करावीत. असं केल्यामुळे पुदिना १५ दिवस टिकतो.

४. पुदिना धुवून झाल्यावर अर्धा तास उन्हात किंवा फॅनखाली वाळवून घ्या. ज्यामुळे त्याच्यातील ओलावा निघून जाईल.

५. पेपर किंवा टिश्यूमध्ये पुदिना रॅप करुन ठेवा.

'या' पद्धतीने पुदिना स्टोर केला तर टिकेल महिनाभर
विदेशात पासपोर्ट हरवला घाबरू नका; प्रथम करा 'ही' गोष्ट

६. पुदिना झीपलॉक बॅगमध्ये ठेवल्यास महिनाभर छान टिकतो.

७. पुदिन्याची पानं काढून ती आइस ट्रेमध्ये भरूनदेखील स्टोर करता येऊ शकतात. या आइस क्यूब्स तुम्ही कधीही वापरु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.