Woman Fashion : एकाच प्रकारचे स्कर्ट घालून कंटाळा आलाय? मग, अशा प्रकारे स्टाईल करा प्लीटेड स्कर्ट

हिवाळ्यात कोणत्याही प्रकारचा आऊटफीट ट्राय करणे हे अवघड असते. कारण, एकतर आपल्याला स्टायलिश लूक हवा असतो आणि थंडीपासून स्वत:चा बचाव देखील करायचा असतो.
Fashion Tips
Fashion Tipsesakal
Updated on

Woman Fashion : हिवाळ्यात कोणत्याही प्रकारचा आऊटफीट ट्राय करणे हे अवघड असते. कारण, एकतर आपल्याला स्टायलिश लूक देखील हवा असतो आणि थंडीपासून स्वत:चा बचाव देखील करायचा असतो. त्यामुळे, अनेकदा आपण संभ्रमात असतो की, थंडीत आऊटफीट नेमका कसा? आणि कोणत्या प्रकारे स्टाईल करायचा?

परंतु, हिवाळ्यात जर तुम्ही प्लीटेड स्कर्ट परिधान करणार असाल तर त्यासाठीच्या खास टिप्स आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. हा प्लीटेड स्कर्ट तुम्ही अनेक प्रकारे स्टाईल करू शकता आणि थंडीपासून स्वत:चे संरक्षण देखील करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात प्लीटेड स्कर्ट स्टाईल करण्याच्या या सोप्या टिप्स.

Fashion Tips
Fashion Tips : साडीमध्ये एलिगंट लूक हवा आहे? मग, साडीवर अशा पद्धतीने स्टाईल करा श्रग

ब्लेजर किंवा जॅकेटसोबत करा स्टाईल

आजकाल प्लीटेड स्कर्टमध्ये अनेक प्रकारचे ऑप्शन पहायला मिळतात. लाँग प्लीटेड स्कर्ट किंवा शॉर्ट प्लीटेड स्कर्टसोबत तुम्ही ब्लेजर किंवा जॅकेट छान प्रकारे स्टाईल करू शकता. यामुळे, तुमच्या लूकला चारचाँद लागतील यात काही शंका नाही.

Pleated Skirt with jacket
Pleated Skirt with jacket

प्लीटेड स्कर्टसोबत तुम्ही अशा प्रकारचे ब्लेजर किंवा डेनिम जॅकेट स्टाईल करू शकता. तुम्ही ऑफिस मीटिंगला देखील असा फॉर्मल लूक करू शकता. यावरील तुमची ज्वेलरी आणि मेकअप सिंपल आणि मिनिमल ठेवा. या स्कर्टवर तुम्ही ब्लॉक हिल्स पायांमध्ये घालू शकता.

लाँग कोटसोबत असा करा स्टाईल

जर तुम्ही फिरायला जाण्यासाठी किंवा ऑफिस मीटिंगसाठी प्लीटेड स्कर्ट परिधान करणार असाल तर त्यासोबत लाँग कोट स्टाईल करा. हा लाँग कोट स्टाईल केल्यामुळे तुमचा लूक खूपच वेगळा आणि सुंदर दिसेल.

Pleated Skirt with long Coat
Pleated Skirt with long Coat

तुमच्या स्कर्टशी कॉन्ट्रास्ट असणारा लाँग स्कर्ट त्यासाठी स्टाईल करा. तुम्हाला हवे असल्यास यावर तुम्ही बेल्ट देखील स्टाईल करू शकता. जेणेकरून तुमचा लूक ग्रेसफूल दिसण्यास मदत होईल. अशा प्रकारचे लाँग कोट तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील.

स्कर्टसोबत लाँग बूट्स करा स्टाईल

प्लीटेड स्कर्टमध्ये कम्फर्टेबल राहण्यासाठी तुमची पादत्राणे आरामदायक असणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही स्कर्टसोबत लाँग बूट्स देखील स्टाईल करू शकता. हे लाँग बूट्स या प्लीटेड स्कर्टवर खूप उठून दिसतात.

Long Boots
Long Boots

खास करून ब्लॅक किंवा नेव्ही ब्लू कलरचे लाँग बूट्स स्कर्टसोबत अधिक चांगल्या प्रकारे सूट होतील, आणि तुमचा लूक अधिक स्टायलिश दिसण्यास मदत होईल.

Fashion Tips
Fashion Tips : हळदीच्या लूकसाठी बेस्ट आहेत 'हे' फ्लोरल आऊटफिट्स, नक्की करा ट्राय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.