Dengue Fever: डेंगीचे केवळ दहा टक्के रुग्ण होतात गंभीर; वेळीच घ्या आरोग्याची काळजी

Dengue Fever: पावसामुळे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात, ओल्या कचऱ्यामध्ये या डासांची उत्पत्ती होते. या आजारांची लक्षणे असलेल्या दोन मुलांचा शहरात मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली.
Dengue Fever
Dengue FeverSakal
Updated on

Dengue Fever: डेंगी किंवा डेंगीसदृश आजारामध्ये आढळणाऱ्या रुग्णांपैकी केवळ दहा ते पंधरा टक्के रुग्ण गंभीर अवस्थेपर्यंत जातात. यात त्यांच्या मृत्यूचीही शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे ठरते. या आजाराची काही लक्षणे जाणवल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपचार घेण्याचे आवाहनही डॉक्टरांनी केले.

‘एडिस’ हा डास चावल्याने डेंगीचा फैलाव होतो. या डासांमुळे मागील काही वर्षांत चिकनगुण्या, डेंगीसारखे आजार होत आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात, ओल्या कचऱ्यामध्ये या डासांची उत्पत्ती होते. या आजारांची लक्षणे असलेल्या दोन मुलांचा शहरात मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. त्यातच आता ‘झिका’चाही धोका वाढला आहे. परंतु, शहरात अद्याप याचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. दुसरीकडे डेंगीचा धोका मात्र वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजाराच्या एकूण रुग्णांपैकी दहा ते पंधरा टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत जातात. यातील काही केसेसमध्ये मृत्यूची शक्याताही नाकारता येत नाही. सध्या डेंगीसदृश आजाराचे पंचवीस टक्के रुग्ण ओपीडीत येतात.

अशी आहेत लक्षणे

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी.

अशी घ्या काळजी

घराजवळ पाण्याचे डबके साचू देऊ नका.

ओला कचरा होणार नाही याची काळजी घ्या.

खिडक्यांना जाळी बसवा.

शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घाला.

डासांची उत्पत्ती होऊ देऊ नका.

Dengue Fever
Dengue Fever in Children: लहान मुलांमध्ये डेंग्यूची झपाट्याने वाढ, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

का होतो मृत्यू?

डेंगी प्रतिकार क्षमता विरोधात काम करते.

डेंगी इमेरेजिक फिव्हर, डेंगी शॉक सिंड्रोम या प्रकारांत अंतर्गत रक्तस्राव, रक्तदाब कमी, ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने

रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते.

परंतु, काहीवेळा याचाही फायदा होत नाही आणि रुग्णाचा मृत्यू होतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

असे आहेत प्रकार, स्टेप्स

डेंगी

शॉक

सिंड्रोम

डेंगी

इमेरेजिक

फिव्हर

क्लासिकल डेंगी

पोटदुखी, उलटी, ताप कमी न होणे, थंडी वाजून ताप येणे, पूर्ण अंगदुखी अशा अवस्थेत रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. या आजारसदृश रुग्णांपैकी दहा टक्के रुग्ण गंभीर अवस्थेपर्यंत जातात.

— डॉ. प्रमोद दुथडे, एमडी मेडिसिन

सामान्यतः पेशी दीड ते साडेतीन लाख पर क्युबिक मिलिमीटर असतात. परंतु, डेंगी इमेरेजिक फिव्हर, डेंगी शॉक सिंड्रोम यात हे प्रमाण बारा हजारांपर्यंत येते. यामुळे रक्तस्राव होतो, तो नियंत्रणात येत नाही. डेंगी शॉक सिंड्रोममध्ये रुग्ण शॉक झाल्यासारख्या अवस्थेत जातो. दहा ते पंधरा टक्के रुग्ण असे आढळतात.

— डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य,

मेडिसिन विभागप्रमुख, घाटी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.