ATM Unblock : तुमचंही एटीएम चुकून ब्लॉक झालंय? असे करा अनब्लॉक

अनेकदा आपल्याकडून घाईगडबडी एटीएम कार्ड ब्लॉक होते किंवा अनेकदा ते सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॉक करावे लागते.
ATM
ATMesakal
Updated on

How To Unblock Block ATM Card : अनेकदा आपल्याकडून घाईगडबडी एटीएम कार्ड ब्लॉक होते किंवा अनेकदा ते सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॉक करावे लागते. मात्र, कार्ड ब्लॉक केल्यानंतर किंवा चुकून ब्लॉक झाल्यानंतर ते अनब्लॉक कसे करावे याबद्दल अनेकांना माहिती नसते. आज आपण चुकून ब्लॉक झालेले एटीएम कार्ड कशा पद्धतीने अनब्लॉक करावे याबद्दल जाणून घेणार आहोत. काही वेळा अनेकदा चुकीचा पिन टाकल्याने एटीएम कार्ड ब्लॉक होते किंवा एटीएम कार्ड हरवल्यास ते ब्लॉक केले जाते.

ATM
Tax On Diwali Gift : दिवाळीला तुम्हालाही मिळतात गिफ्ट? तर, भरावा लागेल टॅक्स

स्वयंचलित पद्धत : तुम्ही सलग तीन वेळा चुकीचा एटीएम पिन टाकल्यास तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होते. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव तुमचे एटीएम 24 तासांसाठी ब्लॉक केले जाते. साधारण 24 तासांनंतर ब्लॉक झालेले तुमचे एटीएम बँकेकडून पुन्हा आपोआप अनब्लॉक केले जाते. त्यामुळे चुकीचा पिन टाकून एटीएम ब्लॉक झाल्यास गाबरून न जाता 24 तास वाट बघा.

अनेकदा आपल्या कार्डवरून चुकीचे व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत तुमचे कार्ड क्षणाचाही विलंब न करता ब्लॉक करा. यामुळे पुढील संभव्य धोके टाळले जाऊ शकतात. कार्ड ब्लॉक केल्यानंतर नव्या कार्डसाठी तुम्हाला नव्या कार्डसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर साधारण ५ ते ७ दिवसात नवीन एटीएम कार्ड दिले जाते.

ATM
ATM मधून पैसे निघत नाहीत परंतु खात्यातून पैसे कट होतात? इथे करा तक्रार

बँकेला भेट देऊन करा अर्ज : जर तुमचे एटीएम कार्ड सुरक्षिततेच्या कारणांमुळे किंवा काही निष्काळजीपणामुळे ब्लॉक झाले असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे एखादे ओळखपत्र दाखवावे लागेल. यानंतर संबंधित बँक तुमचा अर्ज 48 तास ते पाच दिवसांदरम्यान फॉरवर्ड करेल.

एक्सपायरी डेट : एटीएम कार्डची वैधता तीन ते पाच वर्षांपर्यंत असू शकते. अशा स्थितीत एटीएम कार्ड तीन ते पाच वर्षांनी आपोआप संपुष्टात येते. अशा स्थितीत तुम्हाला तुमच्या बँकेकडून नवीन एटीएमची मागणी करावी लागेल. अर्ज केल्यानंतर बँक नवीन एटीएम साधारण पाच ते सात दिवसांत इश्यू करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.