Paneer Face Pack: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किन पाहिजे? मग ट्राय करा पनीरचा फेस पॅक!

पनीरचा फेसपॅक कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत हे घ्या जाणून...
Paneer Face Pack
Paneer Face Packsakal
Updated on

पनीर खायला सर्वांना आवडते? काहींना पनीर करी आवडतात तर काहींना पनीर पराठा आवडतो. प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार पनीर डिश बनवतो आणि खातो. पण, त्वचेची काळजी घेण्यासाठी पनीर वापरता येते हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर तुम्हाला या लेखात याबद्दल माहिती मिळेल.

हे जरी विचित्र वाटत असलं तरी हेच वास्तव आहे. जसे पनीरमध्ये असलेले पोषक तत्व शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्याच प्रकारे ते त्वचेला देखील खूप फायदे देतात. पनीर हे त्वचेसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझिंग एजंट मानले जाते. विशेष म्हणजे याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. यामुळेच आम्ही तुम्हाला पनीरने त्वचेची काळजी कशी करावी हे सांगणार आहोत.

Paneer Face Pack
Health Care News: तुम्हालाही ऑस्टिओपोरोसिसची समस्या आहे का? या गोष्टी खाल्ल्याने मिळतो आराम

पनीर पासून फेस पॅक बनवण्यासाठी आवश्यक वस्तू

पनीर 1-2 तुकडे

1 टीस्पून लिंबाचा रस

1 चमचे मध

2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

पॅक बनवण्याची पद्धत

हा पॅक बनवायला सर्वात सोपा आहे. यासाठी तुम्हाला एका भांड्यात फक्त पनीरचे तुकडे घ्यावे लागतील. त्यात लिंबाचा रस, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून पेस्ट बनवा. बस्स, तुमचा पनीर फेस पॅक तयार आहे.

फेसपॅक लावण्याचा योग्य मार्ग

पनीर फेस पॅक लावण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमचा चेहरा आणि मान पूर्णपणे स्वच्छ करा. यानंतर पनीरचा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावा. सुमारे 15 मिनिटे असेच राहू द्या. 15 मिनिटांनी धुवा. आठवड्यातून किमान दोनदा याचा वापर करा

फायदे

आठवड्यातून दोनदा पनीरपासून बनवलेला फेस पॅक वापरल्यास त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊ लागतात. यासोबतच याच्या वापराने त्वचेचा कोरडेपणाही दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.