Skin Care: चहापावडरचा असा वापर केल्यास कमी वेळात मिळेल सुंदर व आकर्षक त्वचा, फक्त माहित हव्या ‘या’ 4 पद्धती!

चहा पावडरचा स्क्रब बनवून स्किन केअरसाठी वापर केला जाऊ शकतो.
Skin
Skin sakal
Updated on

तुम्ही रोज चहा बनवण्यासाठी चहा पावडर वापरत असाल. अनेक वेळा तुम्ही गार्डनिंगसाठीही याचा वापर केला असेल, पण तुम्ही त्वचेच्या निगा राखण्यासाठी चहा पावडर वापरली आहे का? जर नसेल तर स्किन केयरमध्ये चहा पावडरचा वापर करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

चहा पावडरचा अशा प्रकारे वापर करा: चहा पावडरचा स्क्रब बनवून स्किन केअरसाठी वापर केला जाऊ शकतो. यासाठी चहा पत्ती थोड्या पाण्यात टाकून उकळा.नंतर त्याचे पाणी काढून पत्ती गाळून स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चहा पत्तीमध्ये थोडे मध, गुलाबपाणी, तांदळाचे पीठ आणि लिंबाचा रस मिसळून स्क्रब बनवा आणि चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार हालचालीत मसाज करा. पंधरा मिनिटे तसेच राहू द्या, नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

Skin
Monsoon Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं टाळा, वाढेल आरोग्याच्या समस्या

टॅनिंग निघून जाईल : टॅनिंग दूर करण्यासाठी चहा पत्ती प्रभावी आहे. चहा पत्तीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासून मुक्त करण्यात मदत करतात. याच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा मुलायम होते.

काळी वर्तुळे कमी होतील : काळी वर्तुळे चेहऱ्याचे सौंदर्य फिके पाडण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत, डोळ्यांखालील वर्तुळे काढण्यासाठी तुम्ही चहा पत्तीच्या स्क्रबचा वापर करू शकता. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासोबतच त्वचा मुलायम बनवते.

Skin
Exercise and Health: व्यायाम करणं बंद केल्याचं शरीराला कधी कळतं? शरीरात बदल कसे घडतात?

तेलकट त्वचेपासून सुटका मिळेल : तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही चहा पत्तीचा वापर करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट घटक असलेली चहा पत्ती तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यातही चांगली भूमिका बजावते. त्वचेच्या अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवून त्वचेची खुली छिद्रे कमी करण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.