White Hair : पांढऱ्या केसांच्या समस्येला करा दूर; ट्राय करा घरगुती उपाय, वाचा कोणते?

आजकाल या पांढऱ्या केसांचा ट्रेंड असला तरी पांढऱ्या केसांमुळे अनेकजण हैराण झालेले असतात
White Hair : पांढऱ्या केसांच्या समस्येला करा दूर; ट्राय करा घरगुती उपाय, वाचा कोणते?
Updated on
Summary

आजकाल या पांढऱ्या केसांचा ट्रेंड असला तरी पांढऱ्या केसांमुळे अनेकजण हैराण झालेले असतात

अचानक केस गळणे किंवा केस विरळ होणे अशा अनेक समस्यांना महिलांना बऱ्याचदा तोंड द्यावे लागते. याशिवया पुरुष आणि महिलांमध्ये एकच समस्या असते ती म्हणजे केस पांढरे होणे. आजकाल या पांढऱ्या केसांचा ट्रेंड असला तरी पांढऱ्या केसांमुळे अनेकजण हैराण झालेले आपण पाहत असतो.

अनेक लोकांसाठी वारंवार केस पांढरे होणे ही समस्या बनली आहे. मग यासाठी ते बाजारातून आणलेले केमिकल हेअर डाय किंवा मेहेंदीचा वापर करतात. हे वापरत असताना अनेकजण डोक्याची टाळू आणि कपाळालाही काळे करून घेतात. अशा परिस्थितीत या समस्यांवर काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात. ज्यामुळे केस काळे होतात शिवाय केसांना पोषण मिळून त्यांच्या वाढीसही मदत होते. हे प्रिस्क्रिप्शन पूर्णपणे नैसर्गिक आहेत आणि आयुर्वेदातही यासंदर्भात माहिती दिली आहे. आज हे घरगुती उपाय कोणते ते आपण पाहणार आहोत...

White Hair : पांढऱ्या केसांच्या समस्येला करा दूर; ट्राय करा घरगुती उपाय, वाचा कोणते?
Thigh Exercise: मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

काळा चहा (ब्लॅक टी)

पांढरे केस काळे होण्यासाठी काळ्या चहाचा चांगला परिणाम दिसून येतो. आपले आजी आजोबा केस काळे करण्यासाठी याचा वापर करत होते. यासाठी काळा चहा शिजवून तयार करा आणि थंड होऊ द्या. यानंतर किमान एक तासासाठी याला केसांमध्ये लावून ठेवा आणि त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. या प्रयोगानंतर तुम्हाला केसांमध्ये चमक दिसून येईल. तुम्ही मेहेंदीमध्ये काळा चहा (ब्लॅक टी) मिक्स करून केसांना लावू शकता.

कॉफी

काळ्या चहा व्यतिरिक्त तुम्ही मेहंदीमध्ये कॉफीही मिक्स करुन केसांना लावू शकता. यासाठी पहिल्यांदा एक कप पाण्यात एक चमचा कॉफी पावडर एकत्र करा आणि ती उकळून घ्या. कॉफी थंड झाल्यावर हे पाणी मेहेंदीमध्ये मिसळा आणि याचे मिश्रण तयार करा. ही मेहेंदी सुमारे तासभर लावल्यानंतर केस धुवून टाका. पांढरे केस काळे करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय तुम्ही वापरु शकता.

आवळा

केस मजबूत, दाट आणि लांब ठेवण्यासाठी केसांना आवळा लावला जातो. तसेच केस काळे करण्यासाठीही याचा वापर केला जातो. आवळा एकटा लावण्यापेक्षा मेथीचे दाणे बारीक करून आवळा पावडरमध्ये मिसळून तुम्ही केसांसाठी वापरु शकता. यासाठी ३ टेबलस्पून आवळा पावडर घ्या. त्यात मेथीच्या बियांची पावडर सम प्रमाणात मिसळा आणि तासभर केसांवर लावल्यानंतर धुवून टाका. हे स्कल्प किंवा केसांच्या इतर समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

White Hair : पांढऱ्या केसांच्या समस्येला करा दूर; ट्राय करा घरगुती उपाय, वाचा कोणते?
Health Awareness: एकटेपणा घातक ? वाढू शकतो हृदय आणि रक्तवाहिन्यांचा धोका, तज्ञांचं मत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.