Independence Day 2024 :… जेव्हा लॉर्ड माऊंटबेटन यांना अचानक विचारली स्वातंत्र्याची डेडलाईन! १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

15 August 1947 : भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात जपानची काय भूमिका आहे? १५ ऑगस्ट आणि जपानचं काय आहे कनेक्शन?
Independence Day 2024
Independence Day 2024 esakal
Updated on

Why Did Lord Mountbatten Choose August 15 As India's Independence Day?

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७८ वर्षे झाली. आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देशातल्या प्रत्येक चौकात, शाळेत हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळ आपण इंग्रजांच्या गुलामीखाली होतो. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.

भारताला स्वातंत्र्य सहज मिळालं नाही. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आलं ते १५ ऑगस्ट दिवशी. कारण, या दिवशी इंग्रज अधिकृतरित्या आपल्या भारतातून परतले आणि आपला देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला.

Independence Day 2024
Independence Day : ‘कुणी घर देता का घर’ स्वातंत्र्यसैनिकाचे कुटुंब अद्याप बेघरच, अजित पवारांनी सूचना देऊन तीन वर्ष झाली तरी ...

खरं तर १९३० मध्येच भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झालं होतं. पण तिथून पुढेही आपल्याला अधिकृतरित्या स्वतंत्र होण्यासाठी १७ वर्षे जावी लागली. पण या सतरा वर्षातील संघर्ष कायम होता. मग १५ ऑगस्ट ची तारीख का निवडण्यात आली याचा एक इतिहास आहे.

फ्रेंच लेखक डॉमिनिक लापियरे आणि लॅरी कॉलिंस यांनी त्यांच्या 'फ्रीडम एट मिडनाइट' या पुस्तकात भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचं तपशीलवार वर्णन केलं आहे. यात त्यांनी १५ ऑगस्टच्या तारखेबद्दलची चर्चाही केली आहे. या पुस्तकात म्हटले आहे की, तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड माऊंटबेटन (Lord Mountbatten) यांनी एकदा पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांना तुम्ही भारताला स्वातंत्र्य करण्याची तारीख निश्चित केली आहे का? असा सवाल करण्यात आला.

Independence Day 2024
Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावरच का साजरा होतो? जाणून घ्या रंजक कारण

अचानक विचारल्या गेलेल्या या प्रश्नामुळे माउंटबेटन गोंधळून गेले. त्या गोंधळात त्यांनी १५ ऑगस्ट ही तारीख सांगितली. हीच तारीख का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर त्यांच उत्तर त्यावेळी माऊंटबेटन यांनी दिलं होतं ते असं की, १५ ऑगस्ट १९४५ हा ब्रिटीशांसाठी एक गौरवशाली दिवस होता. कारण, याच दिवशी दुसऱ्या महायुद्धात जपानने त्यांच्यापुढे आत्मसमर्पन केले. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानने हार पत्कारली.

दुसऱ्या महायुद्धावेळी लॉर्ड माउंटबेटन हे दक्षिण-पूर्व एशियाचे सर्वोच्च कमांडर होते. त्यांनी १५ ऑगस्ट रोजीच जपानला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं होतं. त्यामुळेच, त्यांनी ही तारीख जाहीर केली. पण, भारताने त्यांच्यापुढे आत्मसमर्पण केलं नव्हतं. तर, त्यांच्या हातातील भारताची सत्ता हिसकावून घेतली होती.

Independence Day 2024
Independence Day 2024: स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..! यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय? घ्या जाणून

या पत्रकार परिषदेतच लॉर्ड माउंटबेटन यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याच जाहीर केलं. या घोषणेनंतर ‘भारतीय स्वतंत्रता कायदा १९४७’  ने माउंटबेटन यांनी दिलेली तारीख मंजूर केली.

भारत-पाकिस्तानसाठी एकच तारीख का नाही निवडली?

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व सोडण्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख ठरवण्यात आली होती. पण लॉर्ड माउंटबॅटन यांनी पाकिस्तानला १४ तारीख निवडली तर भारताला १५ ऑगस्ट दिवशी सत्ता दिली. असं सांगितलं जातं की लॉर्ड माउंटबॅटन यांना दोन्ही देशांच्या स्वातंत्र सोहळ्यात हजेरी लावायची होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.