शॅम्पूची बाटली तुम्हाला बनवू शकते लठ्ठ; संशोधनाचा निष्कर्ष

शॅम्पूची बाटली तुम्हाला बनवू शकते लठ्ठ; संशोधनाचा निष्कर्ष
Updated on
Summary

३४ विभिन्न प्लॅस्टिक उत्पादकांमध्ये कोणते रसायन आहे याचा अभ्यास केला.

जगामध्ये साधारण २ कोटी लोक आहे ज्यांचे वजन जास्त आहे.

वजन वाढविण्यामागे कित्येक कारणे असू शकतात पण, सध्या एक विचित्र कारण संशोधनातून समोर आले आहे. एका संशोधनातून समोर आले की, शॅम्पूच्या बाटलीमध्ये जे प्लॅस्टिक असे वजन वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. कारण, वैज्ञानिकांना ११ रसायनांचा शोध केला आहे जे आपले मेटाबॉलिज्मवर परिणाम करू शकतात आणि पेयाची बॉटल, किचन स्पंज किंवा केसांना लावायचे कंडीशर सारखे रोजच्या वापरात येणाऱ्या उत्पादने वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

शॅम्पूची बाटली तुम्हाला बनवू शकते लठ्ठ; संशोधनाचा निष्कर्ष
हे घर आहे पूर्णपणे उलटे! पाहाल तर तुम्हालाही चक्करच येईल

हा फॅक्टर आला समोर

नर्वेजियन यूनिवर्सिटी ऑफ सायन्स अन्ड टेक्नॉलॉजीच्या संशोधकाना ३४ वेगवेगळ्या प्लॅस्टिक उत्पदानांमध्ये कोणते रसायन आहे याचा अभ्यास केला. त्यांनी उत्पादनांमध्ये ५५,००० पेक्षा जास्त वेगवेगळे रासायनिक घटक आढळले आणि ६२९ पदार्थ शोधले की ज्यापैकी ११ रसायन मेटाबॉलिज्मवर परिणाम करतात.

डेली मेल च्या वृत्तानुसार, नॉर्वेजियन युनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये असोसिएट प्रोफेसर मार्टिन वॅगनरने सांगितले की, आमच्या संशोधनातून समजले की, साधारण प्लॅस्टिक उत्पादनांमध्ये असे पदार्थांचे मिश्रण आहे जे जास्त वजन किंवा लठ्ठपणासाठी कारणीभूत असू शकतात.

शॅम्पूची बाटली तुम्हाला बनवू शकते लठ्ठ; संशोधनाचा निष्कर्ष
तुमचे ओठ काळे पडलेत! लक्षात ठेवा या पाच गोष्टी

मागील संशोधनामध्ये असे सुचविले होते की,''काही प्लास्टिकमध्ये अंतःस्रावी विघटनकारी रसायने असतात, ज्याला 'ओबेसोजेन' देखील म्हणतात, ज्यामुळे तुमची वाढ आणि प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते. मात्र, आता वजन वाढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवता येईल, असे दिसते.''

मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या काही सामान्य कारणांपैकी एक लठ्ठपणा आहे, यामध्ये देखील हृदय रोग आणि कर्करोग समाविष्ट आहे. जास्त वजन असल्याने विविध संक्रमणे जसे की,''कोरोनाचा परिणामांबाबत तुमची संवदेनशीला वाढू शकते. जगभरात जवळपास दोन कोटी लोक लोक अधिक वजन असलेले आहेत आणि जवळजवळ 650 लाख लोकांचा लठ्ठपणाच्या गटमध्ये आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.