HSC Result 2024 : १२ वी निकाल येण्याआधी पालकांनी या गोष्टी नक्की कराव्यात, मुलांना आधार मिळेल

निकाल लागण्याआधीपासून घरातील वातावरण सकारात्मक कसे राहील याकडे लक्ष द्या
HSC Result 2024
HSC Result 2024 esakal
Updated on

HSC Result 2024 :

गेली वर्षभर केलेला अभ्यास, रात्रीचे जागरण, आई-बाबा, पाहुण्यांच्या अभ्यासासाठीच्या अपेक्षा या सर्वाना आज पुर्णविराम लागणार आहे. कारण, आज दुपारी १ वाजता HSC बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. आज निकाल आहे म्हटल्यावर १२ वी परीक्षेला कोण होत त्याच नाव आठवतं.

तर, घरात असलेल्या १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही सावध केलं जातं. आज निकाल आहे ना रे, अशी आठवण मुलांना करून दिली जाते.  अभ्यास, परीक्षा चांगली गेली असेल तरी मुलांना एक दडपण असतं. निकाल जाहीर होण्याआधी पालकांनी काही गोष्टींबाबत मुलांशी बोलणं गरजेचे आहे.

HSC Result 2024
HSC Exam 2024 : 12 उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे

कारण, निकाल काय लागेल हे तर वेळ आल्यावर समजेल. पण नकारात्मक निकाल लागला तर तो पचवण्याची ताकद मुलांमध्ये यायला हवी त्यामुळे पालकांनी काही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे. आज त्याबद्दल जाणून घेऊयात.

सकारात्मक वातावरण बनवा

निकाल लागण्याआधीपासून घरातील वातावरण सकारात्मक कसे राहील याकडे लक्ष द्या. कारण, जसे परीक्षेच्या काळात तुम्ही मुलांना पाठींबा दिला तशी आजही त्याची गरज मुलांना आहे. त्यामुळेच, घरातील वातावरण मोकळं बनवा. मुलांसाठी हा दिवस स्पेशल आहे त्यामुळेच तुम्ही त्यांचा मूड इतर कारणांनी खराब होणार नाही याची काळजी घ्या.

HSC Result 2024
HSC Exam 2024 : इंग्रजीच्या पेपरला धुळ्यात 2 कॉपीबहाद्दर; विद्यार्थ्यांचा बळावला आत्‍मविश्‍वास

तुमच्या निकालाचे किस्से सांगा

जशी रिझल्टची वेळ जवळ येईल तशी मुले अधिकच दडपणाखाली जातात. त्यामुळे मुलांसोबत वेळ घालवा. त्यांना तुमच्या परीक्षेच्या निकालाबद्दल सांगा. त्यावेळी तुमच्या मित्रांचे रिझल्ट, एखादा किस्सा, गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे मुलांवरील दडपण हलके होईल.

मुलांवर जबरदस्ती करू नका 

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणत मुल लहान असल्यापासूनच त्यांना काय बनवायचं, त्यांनी कशात करिअर करायचे हे घरचे ठरवतात. रिझल्ट लागण्यापूर्वी मुलांशी करिअर, त्यांची आवड कशात आहे याबद्दल जाणून घ्या. रिझल्ट आल्यानंतर जर त्याला वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्याला प्रोत्साहन द्या.

HSC Result 2024
12th HSC Result : बारावीच्या परीक्षेचा आज निकाल;ऑनलाइन पद्धतीने दुपारी एक वाजता जाहीर होणार

करिअरबाबत चर्चा करा

तुमच्या मुलाला कशामध्ये करिअर करायचे हे ठरलेले असेल. तर त्या कोर्ससाठी एखादा एक्स्ट्रा कोर्स कोणता, किंवा त्यांचे कोणता अभ्यास करावा, एखादा कोचिंग क्लास जॉईन करावा, याबद्दल त्याला मार्गदर्शन करा. किंवा कुटुंबातील सदस्यांसारखे त्याला इंजिनिअर व्हायचे असेल तर त्याला काय करावे लागेल हे त्यांच्याकडून जाणून घेऊदेत.

मुलांसाठी प्लॅन करा

रिझल्ट काहीही लागलेला असो सायंकाळी बाहेर जाण्याचा प्लॅन तयार ठेवा. मुलांच्या मार्कचा परिणाम या प्लॅनवर होणार नाही याकडे लक्ष द्या. कारण, अपेक्षित मार्क पडले नाहीत तर मुले नाराज होऊ शकतात. त्यासाठी कितीही मार्क येऊदेत आपण बाहेर जाऊ असे त्यांना सांगा. म्हणजे तेही खूश होतील.

मुलांच्या मित्रांसह निकाल पहा

१२ वी बोर्डाचा रिझल्ट म्हणजे संपूर्ण घरादाराला टेन्शन असतं. तर सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये वर्गातील अनेक मुले एकत्रच राहत असतात. ते एकमेकांचे चांगले मित्रही असतात. त्यामुळे मुलांचा बोर्डाचा रिझल्ट पाहण्यासाठी एकत्र बसा. मुलाच्या मित्रांना, पालकांना घरी बोलवा. मोकळे वातावरण ठेवा आणि मग रिझल्ट पहा. त्यामुळेही मुलांचे दडपण नाहीसे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.