पती पत्नीचे नाते हे नाजूकच असते. त्यात प्रेम आणि विश्वास असला की नाते अगदी घट्ट राहते. पण जेव्हा आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची वेळ येते तेव्हा मध्ये मध्ये वाद, भांडणे ही होणारच ना आणि अशावेळी नवऱ्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते. नातं हे दोघांनी सुद्धा सांभाळले पाहिजे.
लग्नांतर पती-पत्नीच्या नात्यामध्ये चढउतार येणे स्वाभाविक आहे. अशामध्ये नाते टिकविण्यासाठी तुम्हाला समजूतदारपणा दाखवून आपल्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवू शकताता. पण कित्येकदा काही वाईट परिस्थितीमध्ये खूप ताण वाढला की, पार्टनरचा चिडचिडपणा वाढतो आणि अशावेळी त्यांना संभाळून घेणे अवघड होते. अशावेळी जर त्यांना इग्नोर केले तर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.
विशेषत: जेव्हा तुमची पत्नी प्रंचड तणावामध्ये असेल आणि तिचा स्वभाव चिडचिडा होत असेल तर अशावेळी तिच्या भावना समजून घेणे आणि काही गोष्टी फॉलो करून वाईट काळात त्यांना आधार देणे गरजेचे आहे. जर तुम्ही वाईट काळामध्ये पत्नीला आधार दिला तर तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास आणखी वाढेल. इतकेच नव्हे तर तर पत्नीचा चिडचिडा स्वभाव देखील कमी होईल. चला जाणून घेऊ या, चिडचिड्या पत्नीला कसे करावे हॅन्डल केले पाहिजे.
चिडचिड्या स्वभावाच्या बायकोला 'असे' करा हॅन्डल
1. चिडचिड्या स्वभावामागचे कारण पत्नीचा स्वभाव चिडचिडा का झाला आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण जाणून घेतल्यानंतर स्वत:ला प्रश्न विचारा, त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का? उत्तर हो असे असेल तर तुमच्या पत्नीला सॉरी बोलले पाहिजे. दुसरे काही कारण असेल तर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा.
2. धीर धरा
तुमच्या पत्नीची सतत चिडचिड होत असेल तर अशावेळ थोडं धैर्याने घ्या. थोडं धीर धरून परिस्थिती निंयत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पत्नीचा चीडचडा स्वभाव कमी होईल.
3. बाहेर घेऊन जा
कधी धी एकासारख्या रुटीमध्ये पत्नीचा स्वभाव खूप चिडचिडा होतो. अशावेळी पती म्हणून तुमची जबाबदारी असते की आठवड्यातून एकदा पत्नीला बाहेर घेऊन जा. फिल्म पाहणे, किंवा बाहेर जेवण करणे अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पत्नाचा चिडचिडा स्वभाव कमी होईलच त्याशिवाय मूड देखील चांगला राहील.
4. जबाबदाऱ्या वाटून घ्या
दोघांनी मिळून घर सांभाळले पाहिजे. अशावेळी तुम्ही आपल्या घरामध्ये अर्ध्याहून जास्त काम स्वत: केले पाहिजे आणि पत्नीसोबत घरातील काम पूर्ण करण्यासाठी मदत करा.
5. एकत्र वेळ घालवा. रात्री ऑफिसमधून घरी आल्यावर थोडा वेळ पत्नीसोबत वेळ घालवा. त्यामुळे पत्नीचा मूड चांगला होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.