Skin Care: उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीने करा बर्फाचा वापर

बर्फ चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच शिवाय चेहरा टवटवीत दिसतो.
skin
skinsakal
Updated on

त्वचा सुंदर बनवण्यासाठी लोक घरगुती उपचार करतात तसेच महागडे उपचार देखील करून घेतात. तरीही अनेक वेळा अपेक्षित निकाल मिळत नाही. चला, हरकत नाही, आज आम्ही तुम्हाला त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचा एक सोपा उपाय सांगणार आहोत. बेला हदीद आणि इरिना शाक यांसारख्या अनेक हॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याचे रहस्यही हेच आहे.

या अभिनेत्रींच्या चमकदार त्वचेचे रहस्य म्हणजे फेस आयसिंग. चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला फेस आयसिंगच्या सोप्या टिप्सबद्दल सांगत आहोत. यासोबतच त्याचा वापर कसा करावा हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

skin
Women Health: मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या

फेस आयसिंग म्हणजे काय

स्किन आयसिंगला कायरोथेरपी असेही म्हणतात. खरं तर, ही एक प्रकारची स्किन ट्रीटमेंट आहे. याला स्किन फेशियल असेही म्हणतात. फेस आयसिंगमध्ये चेहऱ्याला बर्फाने मसाज केले जाते. त्वचेवर बर्फ लावल्याने ती घट्ट होते आणि ती चमकते.

टॅनिंगपासून सुटका

उन्हाळ्यात टॅनिंग ही सर्वात सामान्य समस्या आहे. टॅनिंगपासून सुटका हवी असेल तर उन्हाळ्यात बर्फ लावा. सुती कापडात बर्फाचा छोटा तुकडा बांधून हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. रोज चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेला फायदा होतो.

skin
Alia Bhatt: आलिया भट्ट लावते मुलतानी मातीचा फेस पॅक, हे आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य

बर्फ कसा लावायचा

  • थेट चेहऱ्यावर बर्फ लावू नका

  • कापडात गुंडाळून किंवा बर्फाची पिशवी त्वचेला लावा

दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा बर्फ लावू नका

प्रत्येक त्वचेसाठी बर्फ लावला जाऊ शकत नाही. जर कोणाची त्वचा अतिसंवेदनशील असेल किंवा एखाद्याने चेहऱ्यावर यापूर्वी लेझर केले असेल तर त्यावर बर्फ लावू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()