नागपूर : लग्न हे नवरा-बायको पुरत मर्यादित नसते तर ते दोन कुटुंबामधील नाते असते. लग्नामुळे दोन कुटुंब एकमेकांच्या जवळ येतात. त्यांच्या संबंधामध्ये वाढ होते. मात्र, आजची तरुण पिढीला हे मान्य नसते. यामुळे ते नात्याला आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवू इच्छितात. यामुळे समोर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पती-पत्नीला एकमेकांचे नातेवाईक पसंत नसल्यामुळे संबंधात दुरावा निर्माण होत असतो. (Identify-whether-your-partner-likes-the-family)
विवाहापूर्वी प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिच्या जीवनसाथीने कुटुंबाचा आणि मित्रांचा आदर केला पाहिजे. आपल्या कुटुंबाला जेवढे मोठे समजतात तितकेच त्यालाही तुमचेच समजा. परंतु, असे काही लोक आहेत ज्यांना पत्नीच्या कुटुंबातील सदस्यांसह जास्त मिसळणे आवडत नाही. काही लोक फक्त चांगले वागत असल्याचे दाखवतात. परंतु, मनापासून ते नापसंत करतात. जोडीदाराला तुमच्या कुटुंबाची आवड आहे की नाही? हे कसे ओळखायचे हे आपण जाणून घेऊ या...
भेटणे फारसे आवडत नाही
तुम्ही कुटुंबासोबत किंवा जुन्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवता तेव्हा ते अस्वस्थ होतात. तुमच्या पार्टनरला ते आवडत नाही आणि ते चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. कधीकधी ते त्यांच्या हावभावांनी किंवा चेहऱ्यावरील भावनेने प्रकट होऊ देऊ शकत नाहीत. परंतु, तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलू लागता तेव्हा ते कंटाळा करतात. कधीकधी ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पार्टनरला तुमच्या कुटुंबासह कुटुंबासह भेटणे आवडत नाही.
कुटुंबाच्या पुढाकाराला थंड प्रतिसाद
पार्टनरला तुमच्या कुटुंबाशी संवाद साधणे आवडत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही संबंध निश्चित करण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबातील सदस्यांचा आपापसात संबंध वाढवण्याची विनंती केली तरीही त्यांची प्रतिक्रिया खूपच थंड राहते. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या पुढाकाराला ते अत्यंत निष्क्रिय मार्गाने प्रतिक्रिया देतात. आवश्यकतेनुसार बोलून वेळ मारून नेतात.
सदस्यांवर टीका करत राहतात
पार्टनरला तुमच्या कुटुंबात रस नसेल तर तुमच्या कुटुंबावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. ते तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वाईट करतात. तसेच त्यांच्यापासून दूर राहणे कसे चांगले आहे हे समजावून सांगत असतात. तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल कुटुंबावर राग असेल तर ते तुमच्या भावना भडकवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.
कुटुंबाला भेटणे टाळतात
तुमच्या कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात ते सहभागी न होण्यासाठी कारण शोधत असतात. तुमच्या कुटुंबातील लोकांना भेटायची वेळ येते तेव्हा त्यांना अतिशय महत्त्वाचे काम येते. एखादी वेळेस ते तुमच्या कुटुंबाच्या घरी गेले तर विचित्रपणे वागत असतात.
तुम्हालाही भेटू देत नाही
काही जण स्वतः तर भेटतच नाही शिवाय आपल्या पार्टनरला देखील कुटुंबाशी भेटू देत नाही. जेव्हाही तुम्ही माहेरी किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी जाण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा ते चांगलाच वाद घालतात. सुरुवातीला ते प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पत्नी समजली नाही तर शाब्दिक वादानंतर मारहाण करण्याचा प्रयत्न करतात.
(Identify-whether-your-partner-likes-the-family)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.