Hair Growth : केस उभे करणारा प्रश्न! आयुष्यभर कटिंग केली नाही तर....

केसांमुळे व्यक्तिमत्व अधिक उजळते असे म्हणतात.
Hair Growth
Hair Growth Sakal
Updated on

Hair Growth : केसांमुळे व्यक्तिमत्व अधिक उजळते असे म्हणतात. आपल्यापैकी अनेकजण केसांच्या लांबीबाबत भरभरून बोलतात. कधी कधी आपल्या नजरेस लांब सडक केस असलेल्या आणि अनेक वर्ष केस न कापलेल्या व्यक्ती पाहिल्या असतील.

Hair Cut
Hair Cut
Hair Growth
Track Difference : मेट्रोच्या नाही पण, रेल्वेच्या ट्रॅकवर का असते खडी?; 'हे' आहे इन्ट्रेस्टिंग कारण

मात्र, अनेक अनेक प्रश्न जे विचार करायला लावतात. असाच एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो तो म्हणजे जर, एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर केसं कापले नाही तर, ते किती लांब होतील. आज आम्ही याच प्रश्नावर उत्तर देऊन वाचकांचं समाधान करणार आहोत.

केसांची लांबी दरवर्षी वाढते

केसांची लांबी एका वर्षात 6 इंचांपेक्षा जास्त वाढत नाही. याशिवाय केसांची वाढ ही दोन वर्षांपर्यंत होते. यानंतर नवीन केस येतात आणि जुने केस गळण्यास सुरूवात होते. जीवंत असेपर्यंत ही प्रक्रिया अशीच सुरू असते.

Hair Growth
Mahatma Gandhi : खाजवा डोकं! भारतीय नोटांवर गांधीजींचा परफेक्ट फोटो कुठून आला?

आयुष्यभर केस कापले नाहीत तर...

केसांची लांबी ही व्यक्तीच्या शारीरिक रचनेवर तसेच त्याच्या आनुवंशिकतेवर अवलंबून असते. वर्षातून 6 इंच म्हणजेच साधारणपणे दर महिन्याला केस साधारण अर्धा इंच वाढतात.

याशिवाय, केस गळणे आणि वाढणे ही प्रक्रियादेखील वेळोवेळी सामान्य प्रक्रियेत चालू असते. त्यानुसार, केस सामान्य स्थितीत कापले नाहीत तर, ते ३ फूट किंवा त्याहून अधिक वाढू शकतात.

Hair Growth
Jawed Habib Hair Care : केसांच्या मूळांना तेल लावणे चुकीचेच; जावेद हबीबचा सल्ला

काही काळानंतर केसांची वाढ थांबते

केसांची वाढ एका विशिष्ट बिंदूपर्यंतच होते. यानंतर केसांची वाढ आपोआप थांबते. वर सांगितल्याप्रमाणे केसांची लांबी सामान्य स्थितीत ३ फूट किंवा त्याहून अधिक असू शकते.

केसांच्या वाढीचे असतात तीन टप्पे

कोणत्याही व्यक्तीच्या केसांची वाढ तीन टप्प्यात होत असते. ज्यामध्ये पहिला टप्पा अॅनाजेन असतो. अॅनाजेन टप्प्यात केसांची वाढ २ ते ८ वर्षांपर्यंत होते. यानंतरची पुढची पायरी म्हणजे कॅटगेन. कॅटेजेनमध्ये संक्रमणाचा टप्पा असतो. यामध्ये केसांची वाढ थांबते. ही अवस्था ४ ते ६ आठवडे राहते. शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्याला टेलोजन असे म्हणतात.

Hair Growth
Hair Transplant Failure : केस प्रत्यारोपण फेल का होते?; जाणुन घ्या

टेलोजन अवस्थेत केसांची वाढ पूर्णपणे थांबते. ही स्थिती दोन ते तीन महिन्यांपर्यंत टिकते. अशा परिस्थितीत केसांची लांबी अनेक मीटर वाढू शकते हा दावा करणं खरा नाहीये. हार्मोनल किंवा अनुवांशिक अपवादामुळे एखाद्या व्यक्तीचे केस अधिक लांब वाढू शकतात. मात्र, असे होणे असामान्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.