प्रत्येक स्त्रीला लांब आणि सुंदर नखांची आवड असते. त्यामुळेच त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेत असताना महिला नखांचीही चांगली काळजी घेतात. महिला आपल्या नखांचे सौंदर्य टिकवण्यासाठी पार्लरमध्ये जातात, पण यानंतर स्त्रिया त्यांच्या नखांची वाढ चांगली होत नसल्याची तक्रार करतात. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो लिंबाच्या मदतीने नखांची वाढ कशी वाढवता येईल.
लिंबूमध्ये अनेक गुणधर्म आहेत. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट नखांसाठी फायदेशीर आहेत. तज्ज्ञांच्या मते, नखांवर लिंबूसोबत ऑलिव्ह ऑईल वापरल्याने नखांची वाढ होऊ शकते.
लागणारे साहित्य
2 चमचे ऑलिव्ह ऑईल
1 टीस्पून लिंबाचा रस
प्रथम आपले नखे पूर्णपणे स्वच्छ करा
यानंतर एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल टाका.
त्यात लिंबाचा रस घाला.
हे मिश्रण नखांवर लावा.
यानंतर हातमोजे घाला.
सकाळी नखे स्वच्छ करा.
यानंतर त्यांना मॉइश्चरायझ करा.
हा उपाय आठवड्यातून 2 दिवस करा.
हा उपाय रात्री करा म्हणजे नखांना पूर्ण पोषण मिळेल.
आपले नखं वारंवार कट करू नका, असे केल्याने ते कमकुवत होऊ शकतात.
आठवड्यातून एकदा नखं स्वच्छ करा
नखं स्वच्छ करताना, त्यांना योग्य शेपमध्ये कट करा.
आपल्या नखांना मॉइश्चराइझ करण्यास विसरू नका.