डेंग्यूमध्ये काय खावे अन् काय खाऊ नये याबद्दल तुम्ही आजपर्यंत ऐकले असेलच; आज तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्यापासून डेंग्यूच्या रुग्णांनी दूर राहावे.
देशभरात कोरोना (Covid-19) महामारीच्या काळात फ्लू आणि डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्येही वाढ होत आहे. जेव्हा हवामान बदलते तेव्हा विषाणूजन्य तापाचे आजार उद्भवणे हे सामान्य आहे. मात्र दरवर्षी या महिन्यात अनेक राज्यांमध्ये डासांचा कहर सुरू होतो. यापैकी डेंग्यू हा सर्वात धोकादायक आजार आहे; कारण यातील अनेक प्रकरणे प्राणघातक ठरू शकतात. डेंग्यूचा प्रसार डासांच्या चावण्याने होतो. त्याचे निदान अनेक वेळा योग्य वेळी न झाल्याने याचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
डेंग्यूची लक्षणे संसर्गाच्या तिसऱ्या दिवसापासून 14 दिवस टिकतात. डेंग्यूच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, तीव्र सांधे आणि स्नायू दुखणे, थकवा, डोळ्यांमागील वेदना, मळमळ / उलट्या, त्वचेवर पुरळ आणि भूक न लागणे यांचा समावेश होतो. आजपर्यंत डेंग्यू आजार बरा होण्यासाठी कोणतेही औषध बनलेले नाही, मात्र योग्य आहारानेच यावर मात करता येते.
डेंग्यूमध्ये काय खावे अन् काय खाऊ नये याबद्दल तुम्ही आजपर्यंत ऐकले असेलच; आज तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्यापासून डेंग्यूच्या रुग्णांनी दूर राहावे.
डेंग्यू आजारातून बरे व्हायचे असेल तर या गोष्टी टाळा
कॅफिन
जेव्हा शरीर डेंग्यूशी लढत असते तेव्हा त्याला भरपूर द्रवपदार्थांची आवश्यकता असते. पाणी, नारळ पाणी, लिंबूपाणी हे पेय प्यावे, परंतु चहा आणि कॉफीचे सेवन करू नये. कॅफिनयुक्त पेये हृदयाचे ठोके वाढवू शकतात, तसेच थकवा आणि स्नायू दुखण्याची शक्यता असते.
तेलकट पदार्थ
डेंग्यूच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. अशा स्थितीत तेलकट किंवा तळलेल्या अन्नापासून दूर राहणे चांगले. यावेळी हलके खावे जेणेकरून अन्न सहज पचेल. तेलकट पदार्थांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तदाबासोबतच कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो.
मसालेदार पदार्थ
केवळ डेंग्यूच नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास मसालेदार अन्नापासून दूरच राहावे. जास्त मसालेदार अन्न पोटात ऍसिड जमा करते, ज्यामुळे अल्सर होऊ शकतो. म्हणजेच आरोग्य बिघडू शकते, त्यामुळे शक्यतो साधे अन्न खा.
मांसाहार घेऊ नका
डेंग्यूच्या रुग्णांनी मांसाहार वर्ज्य करणे आवश्यक आहे, कारण या अन्नामध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे आजारपणात आरोग्य आणखी बिघडू शकते. शरीर आधीच संसर्गाशी लढा देत असते आणि अशा परिस्थितीत मांसाहारासारखे जड अन्न पचवण्यासाठी पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे आरोग्यदायी द्रव आहार घेणे चांगले मानले जाते.
सूचना : या लेखात दिलेल्या टिप्स केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिल्या आहेत, वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. तुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.