Kitchen Jugaad Video : कुटुंबाला सुरक्षित ठेवायचंय, मग चपाती करण्याआधी हे काम नक्की करा

तुम्ही तुमच्या कुटुंबाला खायला देत असलेली चपाती त्यांच्यासाठी सुरक्षित आहे का?
Video
Video sakal
Updated on

चपाती करायची म्हंटल की आपण पीठ दळून आणतो किंवा मार्केटमधून रेडीमेड पीठ आणतो. आणि मग त्यांनतर त्यामध्ये पाणी-मीठ तेल टाकून कणिक मळतो. त्यांनतर त्याच्या चपात्या बनवून त्या तव्यावर टाकून भाजून घेतो. या चपातीला काही लोक तेल किंवा तूप लावतात आणि ते घरातील सदस्यांना गरमागरम खायला देतात. पण तुम्हला माहित आहे का ही चपाती तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित आहे का? किचन जुगाडचा हा व्हिडीओ नक्की बघा.

तुम्ही म्हणाल की आम्ही असं का विचारत आहोत, की चपाती कुटुंबासाठी सुरक्षित आहे का? ही चपाती तर आम्ही घरीच बनवली आहे मग ती खाल्ल्याने कुटुंबाला त्यापासून का धोका असेल. पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही बनवलेली चपातीही धोकादायक ठरू शकते. आता ते कसं ओळखायचं ते पाहुयात.

Video
Morning Routines: सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? मग हे उपाय करून पाहा

सगळ्यात पाहिलं तुम्ही गॅसवर तवा गरम करा आणि त्यावर गव्हाचं पीठ टाका, आणि ते गॅस चालू असतानाच चमच्याने हलवून घ्या. हे पीठ लगेच भाजलं जात असेल किंवा करपत असेल तर यात भेसळ आहे असे समजा. कारण यात हलक्या दर्जाचा मैद्याची भेसळ असू शकते. याचे कारण म्हणजे गव्हाचं पीठ लगेच करपत नाही. पीठ भाजायला जर वेळ लागत असेल तर ते शुद्ध गव्हाचं पीठ आहे. त्यात भेसळ नाही असे समजा.

दुसरी पद्धत म्हणजे, तुम्ही चपाती करताना पीठ नीट चाळून घ्या. पीठ चाळल्यावर गव्हाचा वरच्या भागाचा कोंडा चाळणीत नेहमी राहतो. पण चाळणीत जर गव्हाचा वरच्या भागाचा कोंडा नाही राहिला तर त्या पीठात भेसळ आहे हे समजा.

Video
Vastu Tips: आर्थिक संकटात आहात? मग देव्हाऱ्यात 'या' वस्तू ठेवाच!

जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोणत्याही पदार्थात भेसळ असेल तर ते आरोग्यासाठी चांगलं नाही. तुम्ही यामुळे सुरक्षित नाही. पण जर तुम्ही अशी खात्री करून घेतली तर तुम्हाला भेसळ नक्की ओळखता येईल. तुम्ही भेसळयुक्त पदार्थ खाणं टाळून तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.

पुणेरी तडका युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.