Negative Thoughts: नकारात्मक विचारांमुळे वैतागला आहात का? जाणून घ्या मन शांत करण्याच्या सोप्या ट्रिक

तुमच्या मनातही असे नकारात्मक विचार येत असतील तर मन शांत करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.
Negative Thoughts: नकारात्मक विचारांमुळे वैतागला आहात का? जाणून घ्या मन शांत करण्याच्या सोप्या ट्रिक
Updated on

सगळ्यांच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. कधी चांगला काळ असतो कधी वाईट. अशा स्थितीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक विचार येत असतात. तुम्हाला सकारात्मक विचार प्रेरणा देतात पण नकारात्मक विचार त्रासदायक ठरू शकतात.

मनात विविध प्रकारच्या विचार येत असतात ज्यामुळे नैराश्याची भावना वाढते. तुमच्या मनातही असे नकारात्मक विचार येत असतील तर मन शांत करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. नकारात्मक विचारामुळे आरोग्य, करिअर, कुटुंब या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो.

नकारात्मक विचारांना कसे दूर ठेवावे

व्यायाम करा

तुमच्या मनात जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येऊ लागतात तेव्हा तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करणे चांगले. शरीरातून व्यायाम केल्याने असे हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. मनातील नैराश्याची भावना त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.

व्यस्त राहा

नकारात्मक विचारांपासून दुसरीकडे वळवण्यासाठी व्यस्त राहणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुमच्या आवडत्या गोष्टी करा. मित्राला भेटायला जा. तुम्ही तुमचा कोणताही छंद जसे की, चित्रकला किंवा गाणे असे छंद जोपासू शकता.

Negative Thoughts: नकारात्मक विचारांमुळे वैतागला आहात का? जाणून घ्या मन शांत करण्याच्या सोप्या ट्रिक
Health Care News: थोडासा व्यायाम केल्यानंतर लगेच थकता? स्टॅमिना वाढवण्यासाठी खा हे पदार्थ

शरीरात रक्ताभिसरण सुधारा

जर तुमच्या मनात नकारात्मक विचार वारंवार येत असतील तर जमिनीवर झोपा तुम्हाला दिसेल की शरीरातील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे मनाला बरे वाटते. या काळात मनात कोणते बदल जाणवत आहेत तेही अनुभवा.

प्राणायाम आणि ध्यान

दररोज सकाळी उठल्यानंतर ध्यान आणि प्राणायाम करणे आवश्यक आहे. असे केल्याने मन शांत राहते. याशिवाय शारीरिक स्वच्छतेचीही काळजी घ्या. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी, व्यायामाव्यतिरिक्त, तुम्ही नृत्य, योग इत्यादींची मदत देखील घेऊ शकता.

डायरी लिहा

जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर डायरी लिहिणे उपयुक्त ठरू शकते. समस्येचे कारण लिहून ठेवल्याने मन हलके होते. अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.