Summer Care: उन्हाळ्यात जास्त फिट्ट कपडे घालाल तर होईल हे नुकसान; जाणून घ्या

हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो.
Summer Clothing Tips
Summer Clothing TipsSakal
Updated on

हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो. उन्हाळा आला की, त्वचेच्या ‘फंगस इन्फेक्शन’चे रुग्ण वाढतात. हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम, बुजणारी त्वचा ग्रंथींची छिद्रे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे त्वचा लाल व ओलसर होते. पुढे लहान लहान पांढरे दाणे अंगावर येतात. मेडिकलच्या त्वचारोग विभागात उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासामुळे दररोज ३० टक्के रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्वचारोग (Skin Disease) कक्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात दररोज ३५० रुग्ण येतात. यापैकी १०५ रुग्णांना उष्णतेमुळे त्वचारोग झाल्याचे आढळून आले आहे. (If you wear more fitted clothes in summer, it will be a problem)

  • घामोळ्या- हवेतील उष्मा, दमटपणा, सततचा घाम यामुळे त्वचा ग्रंथींची छिद्रे बुजतात. त्वचेवर लालसर पुरळ उठते. त्वचेची आग होते.

  • बुरशी- बुरशी म्हणजे फंगस. याचे दोन प्रकार असतात. एका प्रकारात त्वचा लाल व ओलसर होते. दुसरा प्रकार नायटाचा असून त्वचेवर कोरडे गोलसर चट्टे उठतात. खूप खाजही सुटते.

  • गळू- याला उबाळू असेही म्हणतात. त्वचेला होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे त्वचेवर पुरळ येते. त्यात पू तयार होतो. गळू झालेला भाग लाल होतो.

  • कोरडी त्वचा- काहींची त्वचा कोरडीच असते.ज्या ठिकाणी उन्हाळ्यातील हवेत आर्द्रता कमी असते. तिथे या व्यक्तींना जास्त त्रास होतो. त्वचेला भेगा पडतात.

  • टॅन- उन्हामुळे त्वचा काळवंडते. त्वचेवर डाग पडतात.

Summer Clothing Tips
Summer Cloths: उन्हाळ्यात घाला हे कपडे; गरमीतही दिसाल कूल!

त्वचा रोग टाळण्यासाठी-

  • रोज दोनदा स्नान करावे

  • त्वचा शक्यतो कोरडी ठेवावी

  • घामाने ओलसर झालेले कपडे बदलावेत.

  • शक्यतो सैल व सुती कपड्यांचा वापर करावा.

  • सनस्क्रीन लोशनचा नियमित वापर करावा.

  • दिवसा दर तीन तासांनी उघड्या त्वचेवर सनस्क्रीन लावावे.

  • भरदुपारी बाहेर जाणे शक्यतो टाळावे.

  • बंद पादत्राणे, बुटांचा वापर शक्यतो टाळावा.

  • कोरड्या त्वचेचा त्रास असेल तर वॉटर वेस्ट मॉइश्चरायझर लावावे.

Summer Clothing Tips
Summer Food Tips : उन्हाळ्यात अन्न खराब होतेय! अशी घ्या काळजी

ॲलर्जीसाठी घातक-

  •  प्रदूषण, फास्ट फूड यांमुळेही अॅलर्जी होते

  •  सूर्यप्रकाशातील तीव्र किरण आणि उष्णतेमुळे सनबर्न होतो

  •  या दिवसात स्कीन टाईट कपड्यांमुळे खरूज वाढते

  •  स्वच्छतेच्या अभावामुळे त्वचेचे आजार होतात.

''त्वचारोग विभागातील एकूण रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण उष्णतेच्या आजाराने त्रस्त आढळून आले आहेत. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना कपड्यांची भूमिका सर्वांत महत्त्वाची असते. जाड, गडद रंगाचे कपडे त्वचेला हानी पोहोचवतात. जाड कापडामुळे सतत घाम येऊन त्वचेवर वाईट परिणाम होतो,'' डॉ. जयेश मुखी (विभागप्रमुख, त्वचारोग विभाग, मेडिकल) यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.