लक्झरी लाइफस्टाइल (lifestyle) जगण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे अनेक जण स्वप्नांचा पाठलाग करत असतात. त्यासाठी उच्च शिक्षण (Higher education) घेऊन विदेशात जातात आणि तेथेच स्थायिक होतात. यात अनेक जणांना विदेशात गेल्यावर आपल्या मातृभूमीचा विसर पडतो. तर, काहींची नाळ मात्र कायम आपल्या मातृभूमीशी जोडलेली असते. त्यामुळे आजवर असे अनेक जण आहेत जे विदेशात राहल्यानंतही त्यांचं आपल्या देशावरचं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीची चर्चा रंगली आहे. विदेशातील बक्कळ पगाराची नोकरी सोडून हा व्यक्ती आपल्या देशात परत आला असून येथे चक्क दुधाचा व्यवसाय करत आहे. (iitians quit his job in usa and earning crores)
सध्या सोशल मीडियावर चर्चा होतीये ती कर्नाटकच्या किशोर इंदुकुरी यांची. अमेरिकेतील नोकरी सोडून ते भारतात परतले असून येथे ते दुग्धव्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच खारीचा वाटा म्हणून ते हे काम करत आहेत.
किशोर यांनी देशात आल्यानंतर दुधाची डेअरी सुरु केली होती. मात्र, पाहता पाहता आज ते एका कंपनीचे मालक झाले आहे. विशेष म्हणजे ४४ कोटी रुपये या कंपनीचा टर्नओव्हर आहे.
२० गायींच्या खरेदीपासून सुरु झाला व्यवसाय
२०१२ मध्ये भारतात आलेल्या किशोर यांनी सुरुवातीच्या काळात २० गायींची खरेदी केली. त्यानंतर हळूहळू त्यांच्या डेरीचा विस्तार होत गेला. काही अडचणीदेखील आल्या. मात्र, संकटावर मात करत आज त्यांनी कंपनी उभारण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे.
'इंडिया टाइम्स'नुसार, किशोर यांनी हैदराबादमध्ये सिड्स फार्म या नावाने डेअरी सुरु केली. आपल्या देशातील जनतेला प्युअर दुधाची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि तेथून त्यांनी जनतेला शुद्ध दुधाचा पुरवठा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, किशोर हे कर्नाटकमधील असून त्यांनी आयआयटी खडगपूर येथून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर मास्टर्स व पीएचडी करण्यासाठी ते अमेरिकेत गेले होते. विशेष म्हणजे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इंटेल या कंपनीत काही काळ नोकरीदेखील केली. मात्र, त्यानंतर त्यांनी भारतात येऊन स्वत:चा व्यवसाय करण्याचा निश्चय केला. आज किशोर यांची कंपनी जवळपास १० हजार ग्राहकांना त्यांची दुग्धसेवा पूरवत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.