वॅक्सिंग आजकाल जवळपास सगळ्या मुली, मुलं करतत. मुली साधारणपणे हाता-पायाचे, अंडर आर्मचे वॅक्सिंग करतात. पुरुषही छातीवरचे केस काढण्यासाठी आता वॅक्सिंग करू लागले आहेत. पण प्रायव्हेट पार्टही स्वच्छ असणे गरजेचे असते. त्यामुळे तेथील केस काढायचे कसे असा प्रश्न बहुतेक मुला-मुलींना पडतो. त्यामुळे बाजारात अशा प्रकारची व्हॅक्सिन कुठल्याप्रकारची उपलब्ध आहेत, याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. प्रायव्हेट पार्ट स्वच्छ असावा म्हणून अनेकांना या भागात वॅक्सिंग करण्याची इच्छा असते. जोडीदाराला चांगले वाटावे हाही एक बाग असतो.
पण ती जागा नाजूक असल्याने वॅक्सिंग पेपर ओढल्यावर साहजिकच दुखू शकते. त्यामुळे जोखीम जास्त आहे. म्हणूनच या भागाचे व्हॅक्सिन करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. या प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेसाठी बिकीनी वॅक्स, फ्रेंच व्हॅक्स आणि ब्राझिलियन व्हॅक्स असे प्रकार उपलब्ध आहेत. यातील फरक लक्षात घेऊन तुम्ही काळजीपूर्वक प्रायव्हेट पार्टचे वॅक्सिंग करा.
बिकीनी व्हॅक्स- अनोळखी व्यक्तीला ती जागा दाखवायला भिती वाटते. पण हे वॅक्सिंग करताना तुम्हाला ती भिती वाटणार नाही.खालच्या भागाच्या व्हॅक्सिंगच्या प्रकारातील पहिला टप्पा म्हणून या व्हॅक्सिंगकडे पाहता येईल. यात खालचे सगळे केस काढले जात नाहीत. तर, बिकिनीच्या आजुबाजूला येणारे सगळे केस काढले जातात. हे करताना तुम्हाला पँटी काढावी लागत नाही. त्याच्या बाजूने योग्य पद्धतीने व्हॅक्सिंग केले जाते. त्यामुळे हे वॅक्सिंग चांगला पर्याय ठरते.
फ्रेंच व्हॅक्स- हे वॅक्सिंग करताना अंतरवस्त्र काढावे लागते. बिकीनी व्हॅक्सिंगप्रमाणे यातही खालच्या भागाचे सगळे केस काढले जात नाहीत. काही भाग तसाच ठेवून बिकीनी वॅक्सिंगपेक्षा जरा जास्त केस काझले जातात. त्यामुळे तुम्हाला खालचा भाग आणखी स्वच्छ वाटतो.फ्रेंच व्हॅक्स हा पहिल्यांदाच खालच्या भागाचे व्हॅक्सिंग कऱणाऱ्यांसाठी अतिशय चांगला पर्याय आहे.
ब्राझिलियन व्हॅक्स- या व्हॅक्सिंगमझ्ये पुढच्यापासून मागच्या भागापर्यंत सगळे केस काढले जातात.यात पृष्ठभागाच्या फटीमध्ये असलेल्या केसांचाही समावेश होतो.असे वॅक्सिंग केल्याने खालचा भाग एकदम स्वच्छ होतो. त्यामुळे हे वॅक्सिंग केल्यावर थोडावेळ दुखू शकते. वॅक्सिंग करताना अंतवस्त्रे काढावी लागतात. तसेच समोरच्या व्यक्तीला सोयीचे होईल अशा पद्धतीने पायांची पोझिशन ठेवावी लागते.
आधी ही काळजी घ्या- खालच्या पार्टचे व्हॅक्सिग करण्याआधी आपल्याला थोडे दुखणार आहे, ही मनाची तयारी ठेवा. एकदा मनाची तयारी झाली असली की मगच वॅक्सिंग करा. सोबत एखादे पेनकिलर ठेवा. तसेच वॅक्सिंगला जाण्यापूर्वी खालची जागा स्वच्छ ठेवा. समजा पार्लरला जाण्याआधी बाथरूमला गेला असाल तर ती जागा साबण लावून स्वच्छ करा. म्हणजे वॅक्सिंग करायला बसल्यावर समोरच्याला वास येणार नाही. महत्वाचे म्हणजे मासिक पाळीच्या काळात असे व्हॅक्सिन करू नका,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.