Dental Health : चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये दंत आरोग्याची महत्वाची भूमिका

दातांचे आरोग्य हे मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडते.
Dental Health
Dental Health esakal
Updated on

Dental Health : मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे शारीरीक, मानसिक आरोग्य फार महत्वाचे आहे. हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, यासोबतच त्यांचे दांतांचे आरोग्य देखील महत्वाचे आहे.

दातांचे आरोग्य हे मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. दातांच्या आरोग्याचा मुलांच्या शारीरिक विकासावर निश्चितच परिणाम होतो. त्यामुळे, लहान मुलांचे दुधाचे दात येण्यापासून ते कायमस्वरूपी दात येण्यापर्यंत दातांची व्यवस्थित काळजी घेणे म्हत्वाचे आहे.

लहान मुलांचे दंत आरोग्य चांगले राखण्यासाठी पालकांनी सुरूवातीपासूनच काळजी घेणे आणि मुलांना हेल्दी सवयी लावणे महत्वाचे ठरते.

Dental Health
Dental Implants : पडलेल्या दातांमुळे बिघडलंय हास्य? ही आहे सुंदर दंतपंक्तीसाठी जादूची छडी !

निरोगी सवयी

लहान मुलांचे दंत आरोग्य चांगले राखण्यासाठी सुरूवातीपासूनच हेल्दी सवयींचा पाया मजबूत करणे फायद्याचे ठरते. त्यासाठी, दातांच्या समस्या टाळण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी दातांचे नियमित ब्रशिंग करणे महत्वाचे आहे. यासोबतच, फ्लॉसिंग आणि नियमित दंत तपासणी करणे गरजेचे आहे.

दातांचा विकास आणि संवादकौशल्य

लहान मुलांच्या संवाद कौशल्यासाठी दातांचे आरोग्य निरोगी असणे हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे, दातांच्या समस्या जसे की, दात किडणे, तोंडात संसर्ग होणे इत्यादी समस्यांमुळे मुलांच्या संवाद कौशल्यावर याचा परिणाम होऊन शब्द आणि आवाज अचूकपणे व्यक्त करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

पोषण आणि पचन

अन्न नीट चघळण्यासाठी आणि अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी निरोगी दात आवश्यक आहेत. त्यामुळे, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी त्यांचा पौष्टिक आहार असणे महत्वाचे ठरते.

मुलांना जर दातांच्या समस्या भेडसावत असतील तर याचा मुलांच्या खाण्याच्या क्षमतेवर ही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे, त्यांना शारीरिक कमतरता देखील जाणवू शकते.

दातांच्या समस्यांपासून बचाव

लहान मुलांचा दातांच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी नियमितपणे दातांची तपासणी करणे महत्वाचे ठरते. दातांची तपासणी नियमितपणे आणि वेळच्या वेळी केल्यामुळे दातांच्या समस्या टाळल्या जातात आणि त्यांच्यापासून बचाव ही केला जातो.

दातांच्या समस्यांमध्ये दात किडणे, हिरड्यांचे रोग इत्यादी समस्यांचा समावेश होतो. त्यामुळे, लवकरात लवकर मुलांचा या दातांच्या समस्यांपासून बचाव करणे महत्वाचे ठरते आणि पुढील गुंतागुंतीच्या समस्यांना आळा घातला जातो.

आत्मविश्वास आणि सामाजिक संवादावर परिणाम

लहान मुलांची हेल्दी स्माईल ही त्यांच्या आत्मसन्मानामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये महत्वाचे योगदान देते. दातांच्या समस्यांमुळे मुलांच्या आत्मविश्वासावर आणि सामाजिक संवादावर परिणाम होतो. परिणामी, मुलांच्या मानसिक आरोग्यावर ही याचा परिणाम होतो.

दीर्घकालीन गुंतागुंत टाळा

जर पालकांनी मुलांच्या बालपणीच दातांच्या सम्यांवर योग्य उपचार केले नाहीत तर पुढे जाऊन अनेक गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका टाळता येत नाही. दात किडणे, हिरड्यांचे रोग आणि डेंटल कॅव्हिटी सारख्या समस्यांवर नीट उपचार केले नाही तर मग पुढे जाऊन मुलांचे दात पडणे, संक्रमण इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

शिक्षण आणि प्रतिबंध

मुलांच्या दंत आरोग्यात पालकांचा सहभाग आणि शिक्षण महत्वपूर्ण भूमिका बजावते. पालकांनी मुलांना लहानपणापासूनच दातांची स्वच्छतेबद्दल आणि आहाराबद्दल योग्य सवयी लावल्या तर मुलांचे दंत आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या सर्व गोष्टींमुळे लहान मुले त्यांच्या दंत आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम होतात.

नियमितपणे दातांची तपासणी

लहान मुलांना दूधाचे दात आल्यापासून पालकांनी त्यांची नियमितपणे दंत तपासणी करणे महत्वाचे आहे. या भेटीमुळे दंतचिकित्सकांना मुलांच्या दंत आरोग्यावर लक्ष ठेवता येते आणि योग्य मार्गदर्शन करता येते.

निष्कर्ष

दातांचे आरोग्य हे लहान मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजातवे. दंत आरोग्य हे केवळ हेल्दी स्माईल पुरते मर्यादित नसून त्यांचे संपूर्ण आरोग्य सुनिश्चित करण्याबद्दल आहे.

लहान मुलांना दांतांच्या स्वच्छतेची सवय लावणे आणि नियमित दंत तपासणीस प्राधान्य देणे या गोष्टी मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. याचा मुलांना आयुष्यभर फायदा होणार आहे.

डॉ. आरती पांडुरंग शिंदे
Dental Surgeon and Oral Implantologist
Dental Health
Parenting Tips : होमवर्क करताना मुले चिडचिड करतात? मग, ‘या’ टिप्सच्या मदतीने लावा अभ्यासाची गोडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()