In Flight Commerce : आजकाल डिजिटल पेमेंटचा जमाना आहे. म्हणून तर केबीसीतही अमिताभ बच्चनजी मोबाईलनेच पैसे ट्रान्सफर करतात. कॅशलेस व्यवहाराचे हे एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा आपण कोणत्याही मॉल किंवा दुकानात शॉपिंग करतो आणि इंटरनेट डाऊन असेल तर कॅश किंवा कार्ड वापरू शकतो.
पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, विमानात फोन फ्लाईट मोडवर असतो, तिथे नेटवर्क नसते तेव्हा कसे पेमेंट होत असेल. तिथेही नेटवर्क नसेल तर कार्डने पेमेंट होऊ शकते का?
फ्लाइट टेक ऑफ होताच सेल्युलर डेटा बंद केला जातो. आणि फोनला फ्लाइट मोडवर ठेवण्यास सांगितले जाते. फोन फ्लाइट मोडवर आल्यानंतर त्यावर इंटरनेटशी संबंधित कोणतेही काम करता येत नाही. आपल्या प्रत्येकाला माहित आहे की फ्लाइटमध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी किंवा नेटवर्क नसते.
आपल्याला विमानात खाण्यापिण्याची सुविधा मिळते आणि किंमतीप्रमाणे तुम्ही क्रू मेंबरला पैसे देऊन ते पदार्थ खायला घेतो. मग त्यावेळी कसे पेमेंट केले जाते. विमान प्रवासादरम्यान केलेल्या व्यवहारांना इन-फ्लाइट कॉमर्स (IFC) म्हणतात. विमानातील क्रेडिट कार्ड वायरलेस हँडहेल्डद्वारे स्वाइप केले जातात परंतु जेव्हा विमान लँड होते. तेव्हा त्या व्यवहारांची प्रोसेस पूर्ण होते.
IFC तंत्रज्ञानासाठी वापरले जाणारे स्वाइप मशीन खरेतर मेमरी आधारित आहे. स्वाइप मशीनला बँकेकडून एक विशेष कोड दिला जातो. ज्याला MCC म्हणतात. सोप्या भाषेत, जर तुम्ही विमानतळावर ड्युटी फ्री मधून कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्यासाठी आणि गेमिंग किंवा इतर विविध वस्तूंसाठी वेगळा कोड तयार केला जातो. (E-Commerce)
असे करण्यामागचे कारण म्हणजे हे मशीन फक्त फ्लाइटने टेकऑफ केल्यावरच वापरले जाते. पण, अनेक लोकांना माहित नाही की तिथे कुठल्याही विशेष कार्डची गरज नाही. अनेक वेळा लोकांमध्ये असाही गोंधळ होतो की फ्लाइटमध्ये स्पेशल कार्ड वापरावे लागते. परंतु तसे नाही.
हे अगदी सामान्य कार्डासारखे आहे. याशिवाय, काही लोकांना असेही वाटते की फ्लाइटमध्ये केलेल्या पेमेंटसाठी ज्यादा शुल्क आकारले जाते. परंतु फ्लाइटमधील व्यवहारासाठी कोणतेही शुल्क नाही. फक्त एवढेच आहे की तुम्ही फ्लाइटमध्ये पैसे भरले तरी तुम्ही उतरल्यावरच तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील. (Flight)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.