वजन कमी करण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते, तेवढीच मेहनत वजन वाढवण्यासाठीही करावी लागते. काही लोक त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत तर काहींना वजन वाढवायचे आहे. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की जंक फूड, पेस्ट्री, कुकीज किंवा आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ तुम्हाला अजिबात मदत करणार नाहीत.
जंक फूड वजन वाढवणं किंवा कमी करणं या दोन्ही बाबतीत हानिकारक ठरतं. याचे कारण असे की त्यामध्ये फक्त उच्च कॅलरी असतात, परंतु आवश्यक पोषक घटक नसतात, ज्याची आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते. त्यामुळे प्रत्येकाने ते टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वजन वाढवणे हे वाटते तितके सोपे नाही. योग्य आहाराने आपण वजन वाढवू आणि कमी करू शकता. येथे आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.
1. अॅवोकॅडो: भरपूर प्रमाणात अॅव्होकॅडोचे सेवन करणे शरीरातील निरोगी चरबी वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. अॅवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे वजन वाढवण्यास मदत करते.
2. बटाटा: वजन लवकर वाढवण्यासाठी तुम्ही बटाट्याचे सेवन सुरू करू शकता. हे तुमच्या शरीराला अतिरिक्त कॅलरीज पुरवते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
3. केळी: जर तुम्हाला खरोखर वजन वाढवायचे असेल तर केळीचे सेवन करणे हा उत्तम पर्याय आहे. केळी हे पचनासाठी तसेच मूड आणि झोपेसाठी खूप फायदेशीर फळ आहे.
4. पीनट बटर: पीनट बटर एक स्वादिष्ट स्प्रेड आहे. त्यात हाय फॅट क्वालिटी असते, जे वजन वाढविण्यात मदत करू शकते. यासोबतच याचे सेवन केल्याने तुम्हाला फायबर, प्रोटीन आणि मॅग्नेशियम देखील चांगल्या प्रमाणात मिळेल.
5. ड्रायफ्रूट्स : काजू, बदाम, अक्रोड इत्यादी ड्रायफ्रूट्स देखील वजन वाढविण्यात खूप मदत करू शकतात. त्यात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे तुमच्या आहारात निरोगी कॅलरी जोडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.