Glowing Skin : ग्लोईंग स्किन हवी आहे ? ‘या’ फळांचा ब्युटी रूटीनमध्ये करा समावेश

आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करत असतो.
Glowing skin
Glowing skinesakal
Updated on

मात्र, तुम्हाला हे माहित आहे का ? की ही सर्व उत्पादने केवळ बाहेरून आपली त्वचा हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करतात. आतून त्वचा चमकदार ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जीवनसत्वांनी युक्त असलेल्या फळांचा समावेश करावा लागेल.

यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन युक्त फळांचे नियमितपणे सेवन करावे लागेल. या फळांच्या सेवनामुळे तुमची त्वचा ग्लो करेल. फळांमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, जीवनसत्वे असतात जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी फ्रूट मास्कचा वापर करू शकता.

चला तर मग कोणती आहेत ही फळे ? ज्यांचा वापर तुम्ही ग्लोईंग त्वचेसाठी करू शकता, त्याबद्दल जाणून घेऊयात. या फळांचा तुमच्या ब्युटी रूटीनमध्ये समावेश करायला अजिबात विसरू नका.

१. लिंबू

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि अ‍ॅंटीऑक्सिड्ंट्स असतात. लिंबाला ब्लिचिंग एजंट म्हणून ही ओळखलं जात. तुमच्या त्वचेवर जर पुरळ, काळे डाग वारंवार येत असतील आणि तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुमच्या ब्युटी रूटीनमध्ये लिंबाचा वापर अशा प्रकारे करा.

  • लिंबाचा रस गुलाब पाण्यात मिक्स करा आणि त्वचेवर लावा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवा.

  • कोरड्या त्वचेसाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी, लिंबाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र मिसळा. आता हे मिश्रण तुम्ही तुमच्या त्वचेवर लावा आणि 10 मिनिटांनंतर चेहरा धुवा.

२. संत्री

त्वचेसाठी संत्र्याचा वापर आयुर्वेदामध्ये अनेक वर्षांपासून केला जातो. लिंबाप्रमाणेच संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात, जे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतात. तुमच्या ब्युटी रूटीनमध्ये तुम्ही संत्र्याचा वापर खालील प्रकारे करू शकता.

  • चेहऱ्यावर पुरळ येत असतील तर त्या जागेवर संत्र्याचा रस लावा आणि १० मिनिटे ते तसच ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका.

  • तेलकट त्वचेसाठी ३ मोठे चमचे संत्र्याचा रस घ्या, १ चमचा लिंबाचा रस घ्या आणि २ मोठे चमचे बेसनपीठ घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद मिक्स करा आता हे सर्व एकत्र करून याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

  • कोरड्या त्वचेसाठी ३ मोठे चमचे संत्र्याचा रस घ्या त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा दूध आणि मध हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

Glowing skin
Skin Care Tips : त्वचेची काळजी घेताना या पाच चूका करणं महागात पडेल; वेळीच बदल करा

३. स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे फळ सर्वांनाच आवडते. स्ट्रॉबेरी जितकी आरोग्यासाठी चांगली असते तितकीच ती त्वचेसाठी देखील फायदेशीर असते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमीन सी आणि सॅलिसिलिक अ‍ॅसिड यांचा समावेश आहे. तुमच्या ब्युटी रूटीनमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरीचा वापर अशा प्रकारे करू शकता.

  • ७-८ स्ट्रॉबेरीज घ्या त्या चांगल्या स्मॅश करा आणि चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने चेहरा धुवून टाका.

४. किवी

तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत असतील किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला सूज येत असेल तर किवीचा वापर करून तुम्ही ती सूज कमी करू शकता. आपल्या त्वचेतील कोलेजन हा घटक वाढवण्यासाठी किवी मदत करते. तुमच्या ब्युटी रूटीनमध्ये किवीचा अशा प्रकारे समावेश करा.

Glowing skin
Parineeti Chopra Skin Care Routine: परिणीती त्वचेची अशा प्रकारे घेते काळजी, फॉलो करते हे खास स्किन केअर रुटीन
  • किवी स्मॅश करा आणि ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

  • स्मॅश केलेल्या किवीच्या मिश्रणात अर्धा चमचा हळद मिक्स करून तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता. या फेस पॅकमुळे चेहरा हायड्रेट राहण्यास मदत मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.