स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात. कोणी पारंपारिक खाद्यपदार्थ तयार करून वाटप करतो, तर कोणी पारंपारिक पोशाखात देशाची ओळख करून देतो.
तुम्हाला मेक-अप करण्याची आवड असेल आणि यंदाच्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला तुमच्या लुकमध्ये तिरंग्याचा समावेश करायचा असेल तर तुम्ही ते अगदी सहज करू शकता. या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही तुमचा लुक तीन रंगात कसा एकत्र करू शकता आणि स्वातंत्र्यदिन कसा साजरा करू शकता हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चेहऱ्यावर नकाशा काढा
आजकाल थ्रीडी मेकअपचा ट्रेंड आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर भारताचा नकाशा बनवू शकता. यामध्ये तुम्ही भगवा, हिरवा आणि पांढरा रंग वापरू शकता. जर तुम्हाला ग्लॅमरस दिसायचं असेल तर मेकअपमध्ये थोडं स्पार्कल म्हणजे चकमकही वापरू शकता.
डोळ्यांचा खास मेकअप
या निमित्ताने तुमचा डोळ्यांचा मेकअप खास बनवायचा असेल, तर या तीन रंगांची चांगल्या दर्जाची आयलायनर पेन्सिल खरेदी करा. आता केशरी आय शॅडो आणि पेन्सिलच्या मदतीने वरच्या पट्टीमध्ये रंग भरा, त्यानंतर खालच्या पट्टीला हिरवा रंग द्या. आता पांढऱ्या आयलायनरच्या मदतीने बॉर्डर हायलाईट करून घ्या. तुमचा तिरंगा आय मेकअप तयार आहे.
नेलपेंट लावा
तुम्ही तुमची नखं तिरंग्याच्या रंगात रंगवू शकता आणि स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता. जर तुमची नखं लांब नसतील तर त्यांना समान करून त्यावर केशरी, हिरवं पांढरं असं नेलपेंटही लावू शकता. तसंच तुम्ही तिरंगी बांगड्याही वापरू शकता.
पोशाख विशेष बनवा
जर तुम्ही तिरंग्याच्या थीमवर मेकअप करत असाल तर पांढरी किंवा हिरवी किंवा भगव्या रंगाची प्लेन साडी नेसणं चांगलं. अशा प्रकारे तुमचा लूक खूप क्रिएटिव्ह आणि सोबर दिसेल. याशिवाय पांढऱ्या सलवार कमीजसोबत तिरंगा दुपट्टा ट्राय करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.