Independence Day 2024 speech: स्वातंत्र्यदिनादिवशी भाषण करण्यासाठी मुलांना सांगा हा मूलमंत्र, शाळेत त्यांचेच भाषण नंबरात येईल

Independence Day Speech Ideas For Kids and Students : मुलांना मुद्दे कसे मांडावे, भाषणाची सुरुवात आणि शेवट कसा करावा याच्या काही टिप्स तुम्ही जर त्यांना दिल्या तर त्यांना भाषण मांडणे सोप्पे जाईल
Independence Day 2024 speech
Independence Day 2024 speechesakal
Updated on

Independence Day 2024 speech:

जेव्हा तुम्ही शालेय शिक्षण घेताना वकृत्व स्पर्धेत भाग घेतला असेल. अनेक वकृत्व स्पर्धा जिंकल्या असतील. आजकालच्या पिढीतही शाळेत अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. पण तितक्या ठामपणे मुलं ते विषय मांडू शकत नाहीत. कारण तांत्रिकदृष्ट्या सगळी तयारी झाली तरी मुलांच्या मुद्दे मांडण्यामध्ये काहीतरी गफलत होते. किंवा काहीतरी अडथळे येऊ शकतात. त्यामुळे मुलांचं भाषण म्हणावं तसं होत नाही.

लवकरच 15 ऑगस्ट दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. शाळेत मुलांच्या स्पर्धा आयोजित केल्या असतील. आणि मुलंही त्याची तयारी जोरदार करत असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

मुलांना मुद्दे कसे मांडावे, भाषणाची सुरुवात आणि शेवट कसा करावा याच्या काही टिप्स तुम्ही जर त्यांना दिल्या तर ते तुमच्यावर खुश होतील. आणि तुमच्या मुलाचं शाळेमध्ये कौतुक होईल.

Independence Day 2024 speech
Prajakta Mali: गेल्या कित्येक जन्मांची पुण्याई की... प्राजक्ता माळीची देशाच्या स्वातंत्र्यदिनी खास पोस्ट चर्चेत Independence Day 2023

या कोणत्या टिप्स आहेत त्याचा मुलांना कसा फायदा होईल हे जाणून घेऊयात.

भाषणाची सुरुवात कशी असावी

भाषणाची सुरुवात दणक्यात करावी असे मुलांना सांगा. मुलं स्टेजवर उभे राहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये असलेला दंगा थांबण्यासाठी वरच्या पट्टीतील आवाज असावा लागतो. कारण गर्दी शांत झाली तर त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज नीट पोहोचू शकेल.

तसेच कुठल्याही भाषणाची सुरुवात जर एखाद्या कवितेने, किंवा देशभक्तीपर गाण्याने केली तर लोकांना अधिक आवडते. त्यामुळे मुलांना हा मुद्दा नक्की सांगा. गाणं कविता संपल्यानंतर भाषणामध्ये स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व काय आहे हे थोडक्यात मांडायला सांगा. यामुळे विषयाची सुरुवात चांगली होईल.

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास मांडायला सांगा

तुमच्या मुलाने भाषणाची सुरुवात दमदार केली असेल तर तो पुढे जाताना डगमगायला नको, यासाठी त्याने पुढे कोणते मुद्दे मांडावे हे सुद्धा सांगा. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात स्वातंत्र्य दिनाचा इतिहास, रणसंग्राम, भारतीय गुलामांचे दुःख, वेदना, शहीद झालेल्या वीरांचे बलिदान, याचे छोटे छोटे किस्से या मधल्या पार्टमध्ये घ्यायला सांगा.

 या छोट्या गोष्टींनंतर तुम्ही भारतीय रणसंग्रामात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक या महान क्रांतिकारकांची नावेही भाषणात घ्या. ज्यामुळे तुमच्या भाषणाला वजन येईल.

Independence Day 2024 speech
Independence Day 2024: यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ट्रॅडिशनल अन् वेस्टर्न कपड्यांचा साधा अनोखा मेळ, फॉलो करा ‘या’ सोप्या फॅशन टिप्स

भारतीय संस्कृतीचा उल्लेख करा

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही करत असलेलं भाषण हे सर्वसमावेशक असेल तर त्याला अधिक मार्क मिळतील. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळालं हे महत्त्वाचं आहेच पण भारतभूमीला लाभलेला इतिहास, भारतीय संस्कृती यांचा उल्लेख भाषणात नक्की करा.

कारण भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासूनच भारताला एक विशेष संस्कृती लाभली आहे जी भारतीय लोकांचं मन आणि खारेपण दर्शवते. भारतात विविध जाती-धर्माचे लोक असले तरी ते सर्व एकत्र येत सर्व सण उत्सव समारंभ साजरे करतात. आणि ही आपल्या देशाची संस्कृतीच आहे.

भारतीय वैज्ञानिक प्रगती नक्की सांगा

भाषणात चौथ्या टप्प्यात तुम्ही भारताने अंतराळयान, सीमा सुरक्षा, औद्योगिक आणि वैद्यकीय क्षेत्रात केलेली प्रगती या मुद्द्यांमध्ये मांडा. म्हणजेच आपण शोधलेले नवीन औषधे, भारतीय बनावटीची मोठी विमाने, भारताने केलेली अंतराळ कामगिरी यांचा उल्लेख करा.

पाचव्या मुद्द्यात तुम्ही भारतासमोर उभी टाकलेली आव्हाने यावर प्रकाशझोत पाडा. भारतासमोर असलेली सुरक्षेची आव्हाने, तसेच पर्यावरण दृष्ट्या भारतात असलेली आव्हाने यांच्या बद्दल बोला.

केवळ समस्या नाही तर त्या सोडवण्यासाठी काय करायला हवं यावरही तुम्ही भाष्य करा. तसेच भारतातील लोकांनी या समस्या सोडवण्यासाठी काय करायला हवं याच्या काही उपाययोजना सुद्धा तुम्ही सोप्या भाषेत सांगू शकता. ज्या लोकांना पटतील. त्यामुळे तुमचे भाषण अधिक वजनदार होईल.

Independence Day 2024 speech
Independence Day 2024: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मुलांनी सहभागी घेतलांय? मग, 'अशा' पद्धतीने वाढवा त्यांचा आत्मविश्वास

भारत स्वतंत्र झाल्यानंतर नव्या भारताच्या पायाभरणीला ज्या ज्या लोकांनी मदत केली पुढाकार घेतला अशा लोकांना विसरू नका. भाषणात अशा लोकांचा उल्लेख नक्की करा. भारतात झालेली कारगिल युद्ध, बॉर्डर वर रोज होत असलेले हल्ले यावर नक्की चर्चा करा.

भाषणाचा शेवट असा करा

तुम्ही एक भारतीय आहात आणि एक सच्चा भारतीय म्हणून तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही एखाद्या कवितेत किंवा शायरी मध्ये उतरवू शकता. एखाद्या प्रसिद्ध कवीची कविता तुम्ही शेवटी म्हणू शकता. त्यामुळे तुमचं भाषण सुटसुटीत आणि सहज समजेल असं होईल.

सर्वात शेवटी तुम्ही जोरात वंदे मातरम, जय हिंद, भारत माता की जय असे नारे लोकांना उभे राहून द्यायला सांगा. आणि ते लोक सुद्धा तुमचं नक्की ऐकतील. त्यामुळे भाषणातील असे मुद्दे नक्की सांगा. तुम्ही जर या गोष्टी फॉलो केल्यात तर तुमचं भाषण नक्कीच सर्वसमावेशक आणि परिपूर्ण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.