Independence Day 2024 : शाळा, संस्था अन् घराची 'अशी' करा सजावट अन् स्वातंत्र्यदिन बनवा स्पेशल

Independence Day Decoration Idea: स्वातंत्र्यदिनाला फुगे, तिरंगा यासारख्या गोष्टींचा वापर करून सजावट केल्यास स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दुप्पट करतील.
Independence Day Decoration Idea
Independence Day Decoration IdeaSakal
Updated on

Independence Day Decoration Idea: दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात हा दिवस साजरा केला जातो. या खास दिनानिमित्त शाळा, घर आणि ऑफिसमध्ये तिरंग्यासह अनेक खास पद्धतीने सजावट केली जाते. स्वातंत्र्यदिनाला पुढील पद्धतींचा वापर करून घर, ऑफिस आणि शाळेला सुंदर सजावट करू शकता.

सुंदर सजावट कशी करावी

कृत्रिम झाड

स्वातंत्र्यदिनाला सजावट करण्यासाठी केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाचं कृत्रिम झाड ऑफिस, शाळा आणि घरात ठेवू शकता. यामुळे ऑफिस डेस्क किंवा घराची शोभा अधिक वाढेल. तुम्ही बाजारात जाऊन किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता.

फुग्यांची सजावट

स्वातंत्र्यदिनी तिरंगी फुग्यांचा वापर करून घर, ऑफिस आणि शाळेच्या प्रवेशद्वारावर सजावट करू शकता. यासाठी तुम्ही केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगांच्या फुग्यांचा वापर करू शकता. हे फुगे घर किंवा ऑफिसच्या गेट, हॉलमध्ये लावू शकता. यामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वाढेल आणि हा दिवस खास बनेल. सजावटीचा हा एक उत्तम पर्याय आहे.

Independence Day Decoration Idea
Shravan Special: श्रावणात चुकूनही 'या' गोष्टी घरात ठेऊ नका , वाढेल नकारात्मकता

ओढणीचा वापर

स्वातंत्र्यदिनाला ओढणीचा वापर करून साजवट करू शकता. यासाठी केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाची ओढणी वापरू शकता. घर किंवा ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा भिंतीवर सुंदर सजावट करू शकता. तसेच सपाट ओढणी पांढऱ्या टिकल्या किंवा छोटे काच लावून आकर्षक सजावट करू शकता.

तिरंगा लाइटिंग

स्वातंत्र्यदिनाला खास बनवण्यासाठी लाइटिंगचा देखील वापर करू शकता. रात्रीच्या वेळी तिरंगा रोषनाई करून घर किंवा ऑफिसला आकर्षक सजावट करू शकता. हा सजावटीचा एक उत्तम पर्याय आहे जो सहज करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.