यावर्षी भारत देश आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. दीडशे वर्षाहून अधिक काळ आपल्यावरती अधिराज्य गाजवणाऱ्या इंग्रजांना हा दिवस नेहमीच लक्षात राहणार आहे. कारण याच दिवशी भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाचे बाजी लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपल्या भारतात आजही त्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी धगधगत आहेत.
15 ऑगस्ट रोजी लोक गल्ली,शाळा,संस्था इथे सजावट करतात. ध्वजारोहन करून घरोघरी जिलेबी घेऊन जातात. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्तीची देशभक्ती त्यादिवशी दिसून येते. भारताबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. (Independence Day 2024)
आजकाल प्रत्येक शाळेची दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने होते. प्रत्येक क्रिकेट टीमच्या मॅचची सुरुवात ही राष्ट्रगीताने होते. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले राष्ट्रगीतच नव्हते. रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये लिहिलेलं जन-गण-मन हे राष्ट्रगीत 25 जानेवारी 1950 रोजी मान्य करण्यात आलं.
स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका असणारे महात्मा गांधी यांनी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर उत्सव साजरा केला नाही. तर पाकिस्तान आणि भारताच्या फाळणीनंतर ज्या काही दंगली झाल्या त्याचे त्यांना दुःख झाले होते. हे दंगे थांबावेत म्हणून त्यांनी कोलकात्तामध्ये उपोषण ही केले.
लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताची सत्ता सोडण्यासाठी 30 जून 1948 पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. पण त्यांनी 15 ऑगस्ट 1947 चा दिवस निवडला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व सोडण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख ठरवण्यात आली होती. पण लॉर्ड माउंटबॅटन यांनी पाकिस्तानला 14 तारीख निवडली तर भारताला 15 ऑगस्ट दिवशी सत्ता दिली. असं सांगितलं जातं की लॉर्ड माउंटबॅटन यांना दोन्ही देशांच्या स्वातंत्र सोहळ्यात हजेरी लावायची होती.
भारताचा पहिला ध्वज हा 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्तामधील पारसी बगन चौकात फडकवण्यात आला होता. भारताच्या पहिल्या ध्वजात लाल पिवळा हिरवा अशा तीन रंगाच्या पट्ट्या होत्या आणि त्याच्यामध्ये ‘वंदे मातरम’ लिहिले होते.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम जे भारताचे राष्ट्रीय गीत आहे त्याची रचना 1882 मध्ये केली होती. या गीताला 24 जानेवारी 1950 मध्ये राष्ट्रीय गाणं म्हणून स्वीकारण्यात आले. वंदे मातरम्, याचा अर्थ 'मी तुला नमन करतो' असा आहे. ही कविता त्यांच्या १८८२ च्या आनंदमठ या बंगाली कादंबरीत समाविष्ट केली होती. ही कविता सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.