Independence Day 2024 : गुलामीच्या अंधारातून तेजोमय स्वातंत्र्य घेऊन येणारी कशी होती १५ ऑगस्ट १९४७ ची ती सुवर्ण सकाळ!

गोरे लोक देश सोडून पळत आहेत, पं.जवाहरलाल नेहरू आता तिरंगा फडकवणार आहेत. हाच सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी लोक दिल्लीत जमत होते.
Independence Day 2024
Independence Day 2024esakal
Updated on

Independence Day 2024 :  

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाली. स्वातंत्र्यसंग्रामात अनेक हुतात्म्यांनी प्राण गमावले. त्यामुळेच आज आपण हा दिवस पाहू शकलो आहोत. देशभरात आज ठिकठिकाणी ध्वजारोहन केले जाते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला.

आज देशभरात उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. देशातील लोकांनी एकमेकांना जिलेबी भरवून हा दिवस साजरा केला आहे. पण खरा तो दिवस कसा होता, ती सकाळ कशी होती जेव्हा खरोखर आपला देश स्वातंत्र्य झाला होता.

तेव्हा लोक प्रगत नव्हते, Whatsapp Facebook सोडा, लोकांकडे फोनही नव्हते. जे काही निरोप होते ते पत्र किंवा माणूस पाठवून पोहोचवले जायचे. काही लोकांना तर आपला देश स्वतंत्र्य झाला हे देखील अनेक दिवसांनंतर समजलं असेल. (Independence Day 2024 )

Independence Day 2024
Independence Day 2024 : वसंतदादा पाटलांना सोडवलं पण स्वत: मात्र धारातिर्थी पडले, कोण होते स्वातंत्र्यवीर आण्णासाहेब पत्रावळे ?
भारताचा पहिला ध्वजारोहन सोहळा
भारताचा पहिला ध्वजारोहन सोहळाesakal

फ्रेंच लेखक डॉमिनिक लापियरे आणि लॅरी कॉलिंस यांनी त्यांच्या 'फ्रीडम एट मिडनाइट' या पुस्तकात भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या त्या दिवसाचं तपशीलवार वर्णन केलं आहे. ‘त्या रात्री ब्रिटीशांचे सैन्य अधिकारी, ब्रिटीश पोलिस यांना भारतीय कार्यालये, लाल किल्ला, घरे, सैनिकी छावन्यांमधून बाहेर काढले जात होते.

१४ ऑगस्टची सायंकाळ झाली तेव्हापासूनच युनियन जॅकचे ध्वज भारतातील सर्वच भागातील कार्यालये, चौकातून उतरवले जात होते.  १४ आणि १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीच सभा भवन नव्या उमेदीने स्वातंत्र्याच्या घोषणेसाठी तयार होते.  जिथे ब्रिटीश अधिकारी, व्हाईसरॉय यांची चित्रे लावली होती. तिथे आता आपला तिरंगा ध्वज गर्वानं फडकत होता.

१५ ऑगस्टच्या सकाळीच देशातील प्रत्येक गावात स्वतंत्र्याचा उत्सव साजरा केला जात होता. कोण-कोण शहीद झाले त्यांच्या आठवणी जाग्या केल्या जात होत्या. लोक गावा-गावातून ट्रक,ट्रॅक्टर,सायकल,बैलगाडी, रेल्वेतून दिल्लीतील इंडिया गेटकडे रवाना होत होते, असे पुस्तकात म्हटले आहे.

Independence Day 2024
Independence Day : आझाद हिंद सेनेतून लढलेला योद्धा नारायणराव फडतरे

लोक उत्साहात सहभागी झाले होते,एकमेकांना शुभेच्छा देत होते. आणि आनंदाने नाचत-गात होते, असेही या पुस्तकात म्हटले आहे. देशातील सर्वच भागातून लोक धावत-पळत दिल्लीकडे येत होते. लोकांनी नवे कपडे घातले, महिलांनी नव्या साड्या नेसल्या.

आतिषबाजी झाली. लोक एकमेकांना दिलासा देत होते, की आपला देश स्वतंत्र्य झाला. गोरे लोक देश सोडून पळत आहेत, पं.जवाहरलाल नेहरू आता तिरंगा फडकवणार आहेत. आणि हाच सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी लोक दिल्लीत जमत होते.

Independence Day 2024
DA Hike Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 16 टक्के वाढीची घोषणा

या सर्व उत्सहात एक भिकारी जेव्हा समारोह विभागात दाखल झाला. तेव्हा त्याला ब्रिटीश सैनिकांनी रोखले. तू भिकारी आहेस, तुझं आमंत्रण पत्र कुठे आहे, इथे वरीष्ठ अधिकारी बसणार आहेत. तेव्हा त्या भिकाऱ्याने चपळाईने उत्साहात उत्तर दिलं, कोण मोठं,कोण छोट, आत्ता आमचा देश स्वतंत्र झालाय,आपण सर्वजण समान आहोत.

Independence Day 2024
Independence Day 2024 : भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर देशाचं स्वरूप कसं असतं?

तेव्हा सर्वांच्याच मनात अन् डोळ्यात प्रखर तेज होतं. आपला देश स्वातंत्र्य झाला अन् त्याचा सर्वांना आनंद झाला होता. घरातील लहान मुलं मोठ्यांना विचारत होती की, देश स्वातंत्र्य झाला म्हणजे काय झालं. आता काय होईल. तेव्हा घरातील लोक, चौकातील जाणकार लोक अडाणी लोकांना समजावत होते की, देश स्वातंत्र्य झाला म्हणजे आता आपल्याला गुलामी करावी लागणार नाही. आपल्यालाही जगण्याचा हक्क मिळेल, मनाप्रमाणे आपण शेती करू, आपला देश सुजलाम सुफलाम बनवू, असेही त्यात म्हटले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.