Cancer Capital Of The World: 'चिंताजनक! भारत जगातील कर्करोगाची राजधानी, अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Cancer Capital Of The World: अपोलो हॉस्पिटल्सने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ ऑफ नेशनच्या अहवालानुसार भारतात दिवसेंदिवस कर्करोगाच्या प्रकरणात वाढ होत आहे.
Cancer Capital Of The World:
Cancer Capital Of The World:Sakal
Updated on

India the cancer capital of the world come out from the report

आजकाल धावपळीच्या जीवनमानामुळे अनेक लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह यासारख्या अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.  अपोलो हॉस्पिटल्सने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ ऑफ नेशनच्या अहवालानुसार भारतात दिवसेंदिवस कर्करोगाच्या प्रकरणात वाढ होत असल्याने भारताला कर्करोगाची राजधानी म्हटले आहे.

आज जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात आहे.  यानिमित्याने अपोलो हॉस्पिटल्सच्या हेल्थ ऑफ नेशनच्या अहवालानुसार अंदाजे तीनपैकी एक भारतीय प्री-डायबेटिक आहे. तर तीनपैकी दोन प्री-हायपरटेन्सिव्ह आहेत आणि 10 पैकी एक डिप्रेशनला सामोरे जात आहे.

या अहवालात भारतातील एनसीडीएसच्या वाढत्या वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय आणि मानसिक आरोग्यसंबंधित समस्यांचा समावेश आहे. या सर्व आजारांचे प्रकरण देशात वाढतांना दिसत आहे. विशेष म्हणजे, जगाच्या तुलनेत भारतातील कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. 

Cancer Capital Of The World:
Breast Cancer: महिलांमध्ये तिशीतच ब्रेस्ट कॅन्सरचा वाढला धोका, अशी घ्या काळजी

प्री-डायबेटिस, प्री-हायपरटेन्शन आणि तरुण वयात उद्भवणारे मानसिक आजार यासारख्या परिस्थितीमुळे आरोग्याच्या समस्येत वाढीचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  

भारतात महिलांमध्ये स्तन, गर्भाशय आणि अंडाशयाचा कर्करोग सर्वात जास्त आढळतो तर पुरुषांमध्ये फुफ्फुस, तोंड आणि प्रोस्टेट कर्करोगाचे प्रकरण आढळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()