Panini Grammar : २५०० वर्षांपूर्वी पाणिनीने घातलेलं संस्कृत कोडं अखेर सुटलं !

संस्कृत कशी बोलली जाते आणि पवित्र ग्रंथांमध्ये तिचा कसा वापर केला गेला आहे, यांतला शास्त्रीय फरक अष्टाध्यायीमध्ये आहे.
Panini Grammar
Panini Grammargoogle
Updated on

मुंबई : केंब्रिज विद्यापीठात पीचडी करणार्‍या एका भारतीय विद्यार्थ्याने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचं क्लिष्ट कोड सोडवलं आहे. २७ वर्षांचा ऋषी अतुल राजपोपट या विद्यार्थ्याने ही कामगिरी केली आहे.

ऋषीने उकल केलेले कोडे प्राचीन काळातील संस्कृत भाषेचे विद्वान पाणिनी यांनी लिहून ठेवले होते. इसवी सन पूर्व पाचव्या- सहाव्या शतकाच्या आसपास विद्वान पाणिनी (Panini) यांनी लिहिलेल्या 'अष्टाध्यायी' या संस्कृत ग्रंथामधील कोड्याची ही उकल आहे.

संस्कृत कशी बोलली जाते आणि पवित्र ग्रंथांमध्ये तिचा कसा वापर केला गेला आहे, यांतला शास्त्रीय फरक अष्टाध्यायीमध्ये आहे. हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Panini Grammar
Inspiration : स्विफ्ट कार कापून तयार केले हेलिकॉप्टर; शेतकऱ्याच्या मुलाची कमाल

पाणिनीने एक "Metarule" शिकवला ज्याचा पारंपरिकपणे विद्वानांनी सांगितलेला अर्थ "समान शक्तीच्या दोन नियमांमध्ये संघर्ष झाल्यास, व्याकरणाच्या क्रमवारीत नंतर येणारा नियम जिंकतो". पण यामुळे अनेकदा व्याकरणदृष्ट्या चुकीचे निकाल मिळतात.

राजपोपटने हा नियम नाकारत शब्दाच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना लागू होणार्‍या नियमांमध्ये आपण उजव्या बाजूस लागू होणारा नियम निवडावा, असा युक्तिवाद केला. असा निष्कर्ष काढला की पाणिनीच्या "Language Machine" ने जवळजवळ अपवाद वगळता व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द तयार केले.

Panini Grammar
Inspiration : अकराव्या वर्षी डोळे गमावले; आता मिळवले ५१ लाखांचे पॅकेज

संस्कृत ही भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे. दरम्यान आज भारतामध्ये केवळ 25 हजार भाषिक संकृत लिहू, वाचू, बोलू शकतात. त्यामुळे अनेक भाषातज्ज्ञ आज राजपोपट यांच्या शोधाला 'क्रांतिकारी' म्हणून संबोधत आहेत. गुरुवारी सबमिट केलेल्या पीएचडीच्या प्रबंधात ऋषीने हा अभ्यास समाविष्ट केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.