तुम्ही निद्रानाश (Insomnia) व ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्नियाशी (Obstructive sleep apnea) झुंज देत आहात का? जर तुमच उत्तर हो असेल तर आताच सावध व्हा. युरोपियन रेस्पिरेटरी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ऑस्ट्रेलियन अभ्यासात निद्रानाश आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्निया म्हणजेच कॉस्मिया (Cosmia) हे कॉकटेल अधिक घातक असल्याचे आढळून आले. संशोधकांना असे आढळले आहे की हृदयविकाराचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका अनेक पटींनी जास्त असतो.
स्लिप ॲप्निया असलेली व्यक्ती साधारण सहा तास व्यवस्थित झोपू शकत नाहीत. अधूनमधून उठायला लागणे, खूपदा कूस बदलावी लागणे, श्वास बंद पडल्यासारखा वाटणे, उठून श्वास घ्यावा लागणे, या गोष्टी वारंवार घडत असतील तर काही तपासण्या केल्या जातात. हा आजार एका ठरावीक पातळीवर पोहोचला असेल, तर रुग्णाला सी-पॅप मशीन वापरावे लागू शकते. ही वेळ आली तर रुग्णाला मशीन आणि ऑक्सिजनचा सिलिंडर घेऊनही फिरावे लागते. यामुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर व कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
सर्वांत सामान्य रोग
निद्रानाश आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्निया (Obstructive sleep apnea) हे झोपेचे सर्वांत सामान्य विकार आहेत. जागतिक स्तरावर दहा ते तीस टक्के लोकसंख्येचा याने बळी घेतल्याचा अंदाज आहे. असे अनेक रुग्ण आहे ज्यांना दोन्हीचा त्रास आहे, असे तज्ज्ञांच्या मत आहे.
ही आहेत मुख्य लक्षणे (These are the symptoms)
निद्रानाशामध्ये (Insomnia) व्यक्तीला झोप लागत नाही
वारंवार निद्रानाश होणे
लवकर झोप उघडणे
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्निया
घोरणे
घसा गुदमरणे
श्वासोच्छवासाचा त्रास
उच्च रक्तदाबाचा धोका
झोपेचा विकार असलेल्या पाच हजाराहून अधिक रुग्णांच्या आरोग्य डेटाचे विश्लेषण केले. यादरम्यान कॉस्मियाच्या बळींमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका दुपटीने वाढल्याचे दिसून आले. त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा धोकाही ७० टक्के जास्त असल्याचे आढळून आले, असे डॉ. बेस्टियन लेचत यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी सांगितले.
अकाली मृत्यूचा धोका
कॉस्मिया या आजाराने ग्रस्त लोकांमध्ये अकाली मृत्यू होण्याचा धोका ४७ टक्के जास्त असल्याचेही नोंदवले गेले आहे. निद्रानाश (Insomnia) आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्नियाचे (Obstructive sleep apnea) कॉकटेल अधिक प्राणघातक असल्याने लक्षणांचा विचार करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.