इंस्टाग्राम. तरुणांच्या अत्यंत आवडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. इंस्टा सुरू केले की किती फोटो बघू किती नाही असे होऊन जाते. काही फूड ब्लॉगरचे फोटो तर मोहावणारे असतात. फूड ब्लॉगर बरोबरीने अनेकजणांना एखादा पदार्थ केला की तो कधी एकदा इंस्टाग्रामवर टाकतो, असे होऊन जाते. आपण केलेल्या पदार्थाचे वेगवगळे देखणे फोटो टाकून तो पदार्थ कसा केला, त्याच्याविषयी अधिक माहिती सांगणे आवडते. म्हणजेच त्यांना आपल्या पदार्थाचा अनुभव इतरांबरोबर शेअर करायचा असतो. जवळपास 70 टक्के लोकांना असे फोटो शेअर करणे आवडते, असे अभ्यासानुसार स्पष्ट झाले आहे. मात्र असे फोटो इंस्टाग्रामवर टाकत असताना त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे. त्या व्यक्तीला कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो तसेच त्याचे वजन वाढते, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
अमेरिकेतील जॉर्जिया सदर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की डिश बनविणाऱयांनी त्यांनी केलेला जेवणाचा फोटो क्लिक केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला की त्यांना समाधानाची भावना असते, पुन्हा दुसऱयांदा ते उत्साहात एखादा पदार्थ करून इंस्टावर टाकतात.
अन्नाचा छान प्रेझेंटेशन केलेला फोटो बघून तुमचा मेदू अन्नाचा वास आणि चव घेण्यासाठी तुम्हाला खुणावतो. त्यामुळे हे फोटो शेअर करत असल्याने पदार्थाची चवही छान होते, असे जुन्या अभ्यासात निदर्शनास आले आहे.
असा आला निष्कर्ष
ज्या लोकांनी फोटो घेतले ते आनंद मिळविण्यासाठी होते, तसेच त्यांना सर्व्हिंग इच्छेनुसार जास्त गुण मिळाले होते, असे आढळून आले. अन्न पदार्थांचा सुरेख फोटो काढून तो सोशल मिडीयावर
टाकल्याने लोकांच्यात अन्न समजण्याची पद्धत आणि लालसा वाढली आहे, असे संशोधनानुसार आढळले आहे. अन्नपदार्थांच्या आठवणी लिहून शेअर करणे आणि आणि रेकॉर्डिंगच्या वापरामुळे आपल्या खाण्यावर परिणाम होऊ शकतो. फोटो पाहून तो पदार्थ खाण्याची इच्छा अधिक बळावते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वजन वाढू शकते.
त्या 145 विद्यार्थ्यांना 12 ऐवजी 6 चीज क्रेकर्स दिल्याचे परिणाम अधिक लक्षणीय असल्याचे दिसून आले.
ज्यांना कॅलरीज कमी करायच्या आहेत त्यांनी चवदार अन्न खात असताना ते जे काही खात आहेत त्याचे फोटो काढणे टाळले पाहिजे, असे संशोधकांनी सुचविले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.