Intermittent Fasting :
जगभरात असे अनेक लोक आहेत जे गरीब आहेत. ज्यांना एकवेळचं खायला मिळत नाही. अशांवर उपाशी झोपण्याची वेळ येते. पण, जगातला असा एक व्यक्ती आहे जो श्रीमंत आहे तरीही तो १८ तास उपवास करतो.
अमेरिकन उद्योगपती आणि बायोटेक फर्मचे सीईओ ब्रायन जॉन्सन हे असा १८ तास उपाशी राहण्याचा प्रयोग करत आहेत. कारण, त्यांना कधीच म्हातारं व्हायचं नाहीय. ब्रायन जॉन्सन हे त्यांच्या 'एज रिव्हर्स' संशोधनावर दरवर्षी $2 दशलक्ष सुमारे 16 कोटी रूपये खर्च करतात.
सध्या ते 47 वर्षाचे आहेत पण त्यांचा असा दावा आहे की, त्यांच्या या प्रयोगामुळे ते १८ वर्षाच्या तरूणासारखे दिसू लागले आहेत. नुकतेच जॉन्सन यांनी त्याचा डायट प्लॅन सर्वांसमोर मांडला आहे. तो नक्की काय आहे जाणून घेऊयात.
YouTuber रणवीर अल्लाबदियासोबत पॉडकास्ट दरम्यान, उद्योगपती ब्रायनने सांगितले की 24 तासांपैकी ते 6 तासांमध्ये मी माझे सर्व जेवण करून घेतो. मला जे काही खायचं आहे ते मी या वेळेत खाऊन घेतो. माझे शेवटचे जेवण सकाळी 11 वाजता होते. ब्रायन सांगतात की तो रोज 18 तास उपवास करतो. त्यांचा असा विश्वास आहे की हे चांगल्या दर्जाच्या झोपेसाठी सर्वात अनुकूल आहे.
पॉडकास्टमध्ये त्याने त्याचा 'अँटी-एजिंग डाएट' देखील सांगितला आहे. ब्रायनने सांगितले की मी माझ्या आहारात डाळी, भाज्या, बेरीज, ड्रायफ्रूट्स, बिया आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरतो. या वेळेत मी साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळतो.
जॉन्सनने दावा केला होता की, त्याने आपले केस गळतीही थांबवली आहे. वयाच्या उतारतीला केस गळू लागले आणि ते पांढरे होऊ लागले. परंतु आज वयाच्या 47 व्या वर्षी त्यांच्या डोक्यावर दाट केस आहेत. एवढेच नाही तर 70 टक्के पांढरे केसही गायब झाले आहेत.
तो म्हणाला, माझे वय पाहता मला टक्कल पडले पाहिजे. परंतु लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत आणि त्यानंतरही तुमचे केस निरोगी ठेवू शकता. ब्रायनने ऑक्टोबरमध्ये त्याचे सर्व प्लाझ्मा काढून टाकून त्याच्या जागी अल्ब्युमिन नावाचे प्रथिन देण्याची प्रक्रियाही पार केली आहे.
या थेरपीचा उद्देश आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे हा होता. त्याने असेही सांगितले की त्याचा प्लाझ्मा इतका शुद्ध आहे की कोणताही वैद्यकीय व्यावसायिक तो फेकून देऊ इच्छित नाही.
असे केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. उदाहरणार्थ, डोकेदुखी, ऍसिडिटी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.