International Chess Day 2023: बुद्धीबळाबद्दल 'या' रंजक गोष्टी माहितीय का?

International Chess Day 2023: भारताने बुद्धिबळ हा खेळ संपूर्ण जगाला दिला आहे. प्राचीन काळी हा खेळ भारतात चतुरंग नावाने खेळला जायचा.
International Chess Day 2023
International Chess Day 2023Sakal
Updated on

International Chess Day 2023: दरवर्षी २० जुलैला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की ज्या व्यक्तीला बुद्धिबळ चांगले खेळता येते त्या व्यक्तीला जीवनातील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाता येते. हा खेळ माणसाला संयम, नियोजन, आत्मविश्वास आणि शिस्त शिकवतो. बुद्धिबळाला इंग्रजीमध्ये चेस म्हणतात. चेसचे नाव ऐकलं की हा खेळ कुठल्यातरी दुसऱ्या देशाचा आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात भारताने बुद्धिबळ हा खेळ जगाला दिला आहे, पण त्यावेळी तो चतुरंगाच्या रूपाने खेळला जात होता.

44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या मशाल रिलेच्या शुभारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चतुरंगाचा उल्लेख केला होता आणि सांगितले होते की, शतकानुशतके बुद्धिबळाची मशाल भारतातून चतुरंगाच्या रूपाने संपूर्ण जगात गेली होती. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. कारण या तारखेला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना झाली. आज या निमित्ताने बुद्धिबळ खेळाच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया.

चतुरंग हा भारतातील एक प्राचीन खेळ आहे. जो काळ्या आणि पांढऱ्या चौकोन असलेल्या बोर्डवर खेळला जातो. पुराणातही याचा उल्लेख आहे. एवढेच नाही तर हडप्पा संस्कृतीत चतुरंगाचे अवशेषही सापडले आहेत. पण सहाव्या शतकात त्याचा प्रसार वाढला आणि या खेळाला लोकप्रियता मिळाली.

त्यामुळेच आजही अनेक इतिहासकार चतुरंगाची सुरुवात सहाव्या शतकापासूनच मानतात. असे म्हणतात की त्यावेळी चतुरंग 64 चौरसांच्या फलकावर खेळला जात असे. त्या वेळी हा खेळ युद्ध स्वरूपाचा होता, ज्यामध्ये पायदळ, घोडदळ, हत्ती, रथ, शूरवीर, रूक आणि बिशप इत्यादींचा समावेश होता.

भारतानंतर हा खेळ पारशी लोकांमध्ये लोकप्रिय झाला आणि पारशी देशांमध्येही खेळला जाऊ लागला. अशाप्रकारे वाढत्या लोकप्रियतेसह, चतुरंग हा खेळ हळूहळू युरोप, चीन, रशिया, स्पेन इत्यादी देशांमध्ये खेळला जाऊ लागला आणि काही काळानंतर हा खेळ जगभर खूप प्रसिद्ध झाला. त्या वेळी, हा पहिला खेळ होता ज्यात खेळण्यासाठी खूप बुद्धीमत्ता लागत होती. जसजशी या खेळाची लोकप्रियता वाढत गेली तसतसे या खेळात आणि नावातही बदल होऊ लागले. दरम्यान, ते चतुरंगातून चतरंग आणि नंतर बुद्धिबळात बदलले.

चेस नाव कसे पडले?

चतुरंगला चेस (Chess) हे नाव फ्रान्समध्ये मिळाले. असे म्हणतात की चतुरंगाचा प्रचार अनेक देशांत पसरल्यामुळे हा खेळ फ्रान्समध्ये पोहोचला तेव्हा तेथे त्याला इचेक (Echecs) असे म्हटले गेले. फ्रेंचमध्ये Echecs म्हणजे हारणे. इचेसला इंग्रजीमध्ये बुद्धिबळ असे म्हणतात. आज, हा खेळ जगभरात FIDE द्वारे नियंत्रित केला जातो, ज्याचे पूर्ण नाव Federation Internationale Des Echecs (फेडरेशन इंटरनॅशनल डी चेस) आहे. FIDE जागतिक स्तरावर बुद्धिबळ खेळांचे आयोजन करते, त्यातील विजेत्याला ग्रँड मास्टर ही पदवी दिली जाते. FIDE हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ किंवा जागतिक बुद्धिबळ महासंघ म्हणूनही ओळखले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.