International Chess Day: बुद्धिबळ खेळल्याने सुधरू शकते स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य...

दरवर्षी जगात 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो.
International Chess Day
International Chess Daysakal
Updated on

हुशार असणारेच बुद्धिबळ हा खेळू शकतात असं म्हंटल जातं. दरवर्षी जगात 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक बुद्धिबळ फार जुना खेळ आहे. या खेळाचे फायदेही कोणते आहेत हे जाणुन घेउया.

बुद्धिबळ हा खेळ तुम्हाला केवळ आनंद देत नाही तर तुमच्या मेंदूला आवश्यक असलेलं वर्कऑउट देखील पुरवते. विशेषतः जेव्हा तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावर असाल जिथे मेंदूला सतत प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अल्झायमरसारखे मेंदूचे विकार टाळण्यासाठी बुद्धिबळ योग्य खेळ आहे. नियमितपणे बुद्धिबळ खेळणे केवळ तुमच्या मेंदूसाठीच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही आश्चर्यकारक काम करते. बुद्धिबळामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते आणि हे खेळल्याने हॅपी हार्मोन्स देखील बाहेर पडतात.

International Chess Day
Health Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या

स्मरणशक्ती सुधारते

बुद्धिबळ खेळल्याने तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास मदत होऊ शकते. हा मानसिक व्यायाम मेंदूसाठी एक विलक्षण वर्कआउट म्हणून काम करतो, हे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म स्मृती दोन्ही वाढवतो.

विचार आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य

बुद्धिबळ हे विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वाढवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. सततच्या मानसिक व्यस्ततेमुळे विचार करण्याची, परिस्थितीचे मूल्यांकन करण्याची आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते. हे कौशल्य वास्तविक जीवनात खूप उपयोगी पडते, ज्याने विविध समस्या सोडवणे शक्य होते.

एकाग्रता आणि फोकस

बुद्धिबळ हा खेळ एकाग्रता आणि फोकसवर भर देते. याचा नियमित सराव एकाग्रता पातळीत लक्षणीय सुधारणा करू शकतो. ज्यामुळे जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये कार्य आणि ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होते.

भावनिक बुद्धिमत्ता

खेळादरम्यान खेळाडूंना उत्साह, फ्रस्ट्रेशन आणि निराशा यासह अनेक प्रकारच्या भावनांचा अनुभव येतो. या भावनांचे व्यवस्थापन करण्यास शिकणे आणि दबावाखाली स्टेबल राहणे हे एक मौल्यवान जीवन कौशल्य आहे जे विकसित करण्यात बुद्धिबळ मदत करू शकते.

Pratima olkha:

Related Stories

No stories found.