International Coffee Day 2024: तुमच्या दैनंदिन जीवनात कॉफीचा 'या' ५ प्रकारे करू शकता वापर

International Coffee Day 2024: तुमचा मुड फ्रेश ठेवण्यापासून ते तुमची त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत कॉफी दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे वापरू शकता.
International Coffee Day 2024
International Coffee Day 2024Sakal
Updated on

International Coffee Day 2024: दरवर्षी 1 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस म्हणून साजरा केला जातो. अनेक लोकांना सकाळी कॉफी प्यायला आवडते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यदायी असतात. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, जे हानिकारक पदार्थांमुळे होणा-या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते. तुमचा मुड फ्रेश ठेवण्यापासून ते तुमची त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत कॉफी दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे वापरू शकता.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमधील एका अभ्यासानुसार, भाज्या आणि फळांप्रमाणेच कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर असते. कॉफीच्या बीया वनस्पतीपासून बनवलेले असतात. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यात B2, B3 आणि B5 यासह अनेक B जीवनसत्त्वे तसेच मँगनीज, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक असतात.

कॉफीमध्ये कॅफिन हे मुख्य उत्तेजक घटक आहे. जे शरीराची ऊर्जा पातळी वाढवू शकते आणि शारीरिक कार्यक्षमता वाढवू शकते. तुम्ही पुढील प्रमाणे दैनंदिन जीवनात कॉफीचा वापर करू शकता.

रोजच्या दैनंदिन जीवनात पुढील प्रमाणे करा कॉफीचा वापर

शरीर रिलॅक्स होते

कॉफी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. तसेच फ्रेश वाटते. तुम्ही दिवसभर थकून घरी आल्यावर एक कप कॉफी प्यायल्यास तुमचा थकवा कमी होतो. यामुळे दैनंदिन जीवनात कॉफीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

हाताचा कोपर स्वच्छ

कॉफीचा वापर करून त्वचेवरचे टॅन कमी करू शकता. तसेच हाताच्या कोपऱ्यावर असलेला काळेपणा कमी करण्यसासाठी कॉफी वापरू शकता. यासाठी एक चमचा कॉफीची पेस्ट घेऊन त्यात ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करावे आणि त्यावर स्क्रब करावे. यामुळे काळेपणा कमी होतो आणि त्वचा उजळ होते.

कॉफीपासून पदार्थ

कॉफीपासून विविध पदार्थ तयार करू शकता. तुम्ही कॉफी, केक, आइसक्रीम, ब्राऊनीज यासारखे विविध पदार्थ तयार करू शकता.हे पदार्थ खाऊन तुम्हाला फ्रेश वाटेल तसेच घरी बनवायला सोपे असल्याने घरातील सदस्य देखील आनंदी होतील.

International Coffee Day 2024
Navratri 2024: नवरात्रीत विड्याच्या पानांशी संबंधित करा 'हे' उपाय, आर्थिक संकट दूर होऊन भाग्य उजळेल

कॉफी फेस मास्क

कॉफीचा फेस मास्कसारखा देखील वापर करू शकता. यामुळे त्वचा चमकदार बनते. यासाठी कॉफीची बारिक पावडर दही किंवा मधमध्ये मिक्स करावी. नंतर हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करावी. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचेवरील टॅन कमी होईल आणि चेहरा चमकदार दिसेल.

तुमचा मूड चांगला होतो

कॉफी प्यायल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. कारण कॅफीनमुळे केंद्रीय मज्जासंस्था उत्तेजित होते. सकाळी एक कप कॉफी प्यायल्याने दिवसाची चांगली सुरूवात होते. तसेच तुम्हाला उत्साही वाटते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()