परदेशात 'ब्लॅक सॉल्ट राईस'ला मागणी, भारतातील सर्वात महाग अन् पौष्टिक तांदळाबद्दल घ्या जाणून

'ब्लॅक सॉल्ट राईस' हा एक पौष्टीक धान्याचा प्रकार आहे. अनेक आजार दुर करण्यासाठी फायद्याचा आहे.
black salt rice
black salt rice
Updated on

'ब्लॅक सॉल्ट राईस' हे ऐकल्यावरच काहींना धक्का बसला असले. तरा काहींनी माहिती असेल पण या तांदळाचे फायदे माहिती नसतील. हो ना. 'ब्लॅक सॉल्ट राईस' हा एक पौष्टीक धान्याचा प्रकार आहे. अनेक आजारांसाठी हे लाभकारी मानले जात असल्याने डॉक्टर याच्या सेवनाचा सल्ला देतात.

योगी आदित्यनाथ सरकार यांनी नुकताच उत्तर प्रदेश मधील पूर्वांचलची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ब्लॅक सॉल्ट राईस'ला सिद्धार्थनगर का ओडीओपी (एक जिल्हा एक उत्पादन) म्हणून घोषित केलं होतं.

योगी आदित्यानाथांच्या या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर या तांदळाची मागणी वाढली आहे. भारताच्या समृद्ध खाद्य संस्कृतीचे अनोखे प्रतीक असणाऱ्या या तांदळाला 'ब्लॅक राईस' किंवा 'फॉरबिडन राईस' असेही म्हणतात, लवकरच अमेरिकेत आपला ठसा उमटवणार आहे.

black salt rice
Monsoon Health News : संततधार पावसामुळे जलजन्य आजार बळावले; अशी घ्या काळजी, आरोग्य यंत्रणेचे आवाहन

'ब्लॅक सॉल्ट राईस' आता प्रथमच अमेरिकेत निर्यात होणार आहे. भारत हे पौष्टिक अन्न इतर कोणत्याही देशात निर्यात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी भारताने आरोग्यासाठी फायद्याचे असणारं धान्य निर्यात केलं आहे. नेपाळ, सिंगापूर, जर्मनी, दुबई आदी देशांमध्ये यापूर्वी 'ब्लॅक सॉल्ट राईस' ची निर्यात करण्यात आली होती.

अमेरिकेपूर्वी इंग्लंडमध्येही भारतात पिकवल्या जाणाऱ्या या तांदळाच्या चव आणि सुगंधाचे चाहते आहेत. तर आपण जाणून घेऊयात, 'ब्लॅक सॉल्ट राईस' हा प्रकार आहे तरी काय आणि परदेशात त्याची मागणी वाढण्यामागील कारण काय आहे?

'ब्लॅक सॉल्ट राईस' हा प्रकार काय आहे?

ब्लॅक सॉल्ट राईस' हा एक पौष्टीक धान्याचा प्रकार आहे. या तांदळात जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचा वापर आरोग्याशी संबंधित अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो. या तांदळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पांढऱ्या आणि तपकिरी तांदळाच्या तुलनेत काळ्या तांदळात लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि जस्त जास्त असते.

black salt rice
Health: तोंडाचे आरोग्य जपाण्यासाठी टूथब्रश किती दिवस वापरावा; जाणून घ्या

भारतात कधी आला?

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, हे तांदूळ सहाशे वर्षापुर्वी आपल्या देशात आढळले. याला भगवान बुद्धाचा महाप्रसाद किंवा द बुद्धा राइस म्हटले जाते. उत्तर प्रदेश आणि नेपाळचे पारंपारिक शेतकरी याचे पिक घेतात. उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर, बस्ती, गोंडा, गोरखपूर, संत कबीर नगर, महाराजगंज आणि कुशीनगर या जिल्ह्यांमध्येही याचे पिक आहे.

या तांदळाचे फायदे काय?

हृदयासाठी चांगला

हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात.

अशक्तपणा अन् अल्झायमर

काळ्या तांदळाच्या सेवनाने अशक्तपणा आणि थकवा येण्याची समस्या दूर होते. यासोबतच अल्झायमरची समस्येवरही हा तांदुळ फायद्याचा ठरतो.

बॉडी डिटॉक्स ठेवण्यास मदत

काळ्या तांदळाच्या सेवनाने बॉडी डिटॉक्स होते. अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर होतात.

ब्रेस्ट कॅन्सर

शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर करून ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव होतो.

वजन नियंत्रणात

काळा तांदळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

black salt rice
ICMR Health Report :स्वयंपाक करताना वापरलेलं तेल पुन्हा वापराव का? ICMR ने सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

तांदळाला सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व

प्राचीन काळी, 'ब्लॅक सॉल्ट राईस' विशेषतः राजघराण्यांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये वापरला जात असे.सुरुवातीला शेतकऱ्यांनी त्यांचे पारंपरिक ज्ञान आणि तंत्र वापरून काळ्या तांदळाची लागवड केली. त्यांनी हे ज्ञान पिढ्यानपिढ्या शेअर केले आणि जपले.

वाढत्या मागणीमुळं शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली

वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले की, 'ब्लॅक सॉल्ट राईस' मध्ये जास्त प्रमाणात अँथोसायनिन्स असते, ज्यामुळे त्याला एक विशेष रंग आणि आरोग्याचे फायदे मिळतात.

या वैज्ञानिक शोधामुळे शेतकऱ्यांना ते पिकवण्याची प्रेरणा मिळाली. 'ब्लॅक सॉल्ट राईस' लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थांनी अनेक प्रयत्न केले आहेत. यासाठी अनेक कार्यक्रम राबवण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून माणून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे. त्यामुळं हा तांदुळ खाण्याचे आरोग्य फायद्यांबाबत जागरुकता वाढली आहे. यामुळे या तांदळाची मागणी वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना हा भात पिकवण्याची प्रेरणा मिळाली आहे. 'ब्लॅक सॉल्ट राईस' च्या वाढत्या मागणीमुळे तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही लोकप्रिय झाला आहे. यामुळे भारतातून 'ब्लॅक सॉल्ट राईस' ची निर्यात वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.