International Ice Cream Day : 'हे' आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम, याच्या किमतीत कारही खरेदी करू शकता

लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम.
Ice Cream
Ice Creamsakal
Updated on

लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. आईस्क्रीम हा असा पदार्थ आहे जो कितीही खाल्ला तरी पोट भरते पण मन मात्र काही भरत नाही. आईसक्रीम म्हणजे अनेकांचा विक पाईंट. भरपूर जेवल्यानंतर पोट कितीही भरले तरी आईस्क्रीम समोर आल्यावर त्याला कोणीही नकार देऊ शकत नाही. परदेश असो किंवा भारत जगभरात सर्वत्र आइस्क्रीमप्रेमी आहेत. कोणतीही पार्टी, लग्न, बिझनेस मीटिंग अगदी छोटसं गेट टूगेदर असलं तरी स्वीटमध्ये आईस्क्रीमशिवाय अपूर्ण आहे. आज 17 जुलै रोजी जागतिक आईस्क्रीम दिन आहे.

तुम्ही आजवर खूप आईस्क्रीम खाल्ले असेल. काही वर्षांपूर्वी 1 रुपयात मिळणारे मँगो किंवा ऑरेंज आईस्क्रीम असो किंवा आज उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फ्लेवरचे कोन आईस्क्रीम असो. आईस्क्रीमचे इतके प्रकार खाल्ल्यानंतरही तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महाग आईस्क्रीम कोणते आहे?

जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमच्या कपाची किंमत कारच्या किमतीएवढी आहे. त्या आईस्क्रीमचा एक चमचा तरी खाली पडला ना तर समजा तुमचे लाखांचे नुकसान झाले आहे. या आईस्क्रीमची किंमत इतकी आहे की तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत पुढील 10 वर्षांसाठी सर्वोत्तम आइस्क्रीम खाऊ शकता. मात्र, आता प्रश्न पडतो की ते आईस्क्रीम काय आहे आणि त्याची किंमत काय आहे?

खरंतर, जगातील सर्वात महाग आईस्क्रीम म्हणजे 'BYAKUYA' नावाचं जपानी आईस्क्रीम. या आईस्क्रीमच्या एका कपची किंमत अंदाजे 8,80,000 जपानी येन आहे, जर आपण त्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केली तर त्याची किंमत सुमारे 5,28,409 रुपये असेल. याशिवाय, जर तुम्ही या आइस्क्रीमचे 1 किलोचे पॅक विकत घेतले तर तुम्हाला त्यासाठी 12 लाखांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत आता तुम्ही सहज अंदाज लावू शकता की या किमतीत तुम्ही चांगली एसयूव्ही कार खरेदी करून घरी आणू शकाल.

ही या आइस्क्रीमची खासियत आहे

मात्र, या आइस्क्रीमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आपले नाव नोंदवले आहे. हे आइस्क्रीम जपानी आइस्क्रीम ब्रँड सेलाटोने बनवले आहे. Celato ने आपल्या आइस्क्रीमला व्हाईट नाईट असे नाव दिले आहे. हे आइस्क्रीम बनवण्यासाठी जपानी आणि युरोपियन घटकांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये दोन पदार्थ अतिशय खास आहेत, त्यापैकी एकाचे नाव साकेकासू आहे. ते तयार करण्यासाठी सुमारे 1.5 वर्षे लागतात. त्याच वेळी, या आईस्क्रीमच्या वर एक गोल्डन पान देखील आहे.

Shabda kode:

Related Stories

No stories found.