International Mountain Day 2023 : आंतरराष्ट्रीय पर्वत दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

जगभरात दरवर्षी आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो.
International Mountain Day 2023
International Mountain Day 2023 esakal
Updated on

International Mountain Day 2023 : जगभरात दरवर्षी आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. पर्वत हे आपल्या निसर्गाचा प्रमुख आणि महत्वाचा भाग आहे. त्यामुळे, या पर्वतांचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पर्वतांच्या महत्वाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २००२ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष म्हणून घोषित केले होते.

त्यानंतर, संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या या घोषणेनंतर ११ डिसेंबर २००३ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यात आला. हा पर्वत दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की, पर्वतांचे संरक्षण करताना शाश्वत विकासाला प्रोत्साहन आणि प्राधान्य देणे.

मानवी जीवनात पर्वतांचे महत्व आणि त्यांची महत्वपूर्ण भूमिका ओळखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्याची परंपरा संयुक्त राष्ट्रांनी सुरू केली. ही परंपरा आजतागायत सुरू आहे. आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त या दिवसाचा इतिहास आणि महत्व आपण जाणून घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचा इतिहास काय?

पर्वतांच्या संवर्धनाकडे आणि संरक्षणाकडे १९९२ मध्ये जगाचे लक्ष वेधले गेले, जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी एक प्रस्ताव आणला. या प्रस्तावानुसार यूएन कॉन्फरन्स ऑन एनव्हायर्नमेंट अँड डेव्हलपमेंटने अजेंडा 21 च्या 13 व्या अध्यायावर, "नाजूक इकोसिस्टम्सचे व्यवस्थापन: शाश्वत माउंटन डेव्हलपमेंट" वर जोर देण्यात आला.

सर्व देशांच्या व्यापक पाठिंब्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये २००२ हे वर्ष पर्वतांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले गेले. या घोषणेनंतर पहिला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस हा 11 डिसेंबर 2003 रोजी साजरा करण्यात आला, तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे महत्व काय?

जगभरातील पर्वत हे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करतात. त्यामुळे, पर्वतांचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. पर्वतीय पर्यावरणाचा मुद्दा गांभीर्याने घेण्यात या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाने महत्वाची भूमिका बजावली.

खरं तर हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाल्यापासून पर्वतीय पर्यटनामध्ये कमालीची वाढ झाली, आणि पर्वतीय पर्यटनाला योग्य चालना मिळाली. मागील काही वर्षांमध्ये पर्वतीय पर्यटनाची लोकप्रियता चांगली वाढली आहे. 

परंतु, पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणाची हानी होण्याचा ही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, पर्यावरणाची आणि पर्वतांची हानी होऊ न देणे ही काळजी पर्यटकांनी घ्यायला हवी. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करून जैवविविधता टिकवण्यासाठी योगदान देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.

International Mountain Day 2023
Best Hillstaions : बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे? मग, उत्तराखंडच्या ‘या’ बेस्ट ठिकाणांची करा निवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.