International Nurses Day 2024 : जिच्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिवस साजरा केला जातो ती फ्लोरेंस नाइटेंगल कोण होती?

ICN ने काय ठरवलीय यंदाची थिम?
International Nurses day 2024
International Nurses day 2024esakal
Updated on

International Nurses Day 2024 :

हॉस्पिटलमध्ये एखादा रूग्ण दाखल झाला तर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपेक्षा तिथल्या नर्सेस जास्त लक्षात राहतात. कारण, डॉक्टरापेक्षा जास्त काळजी त्या आपली घेतात. अशाच या नर्स, मावशी, आंन्टी यांचा आज दिवस आहे. म्हणजेच, आज आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन आहे.

एखाद्या पेशंटला बरं करण्यात जसे डॉक्टर महत्त्वाचे असतात. तसेच, जीव लावून काळजी घेणाऱ्या नर्सेसही असतात. स्पेशली लहान मुलांना हाताळताना नर्स विशेष काळजी घेतात. परिचारीकांच्या याच कामाचा सन्मान म्हणून दरवर्षी १२ मे रोजी परिचारीका दिवस जगभरात साजरा केला जातो. (International Nurses Day 2024)  

International Nurses day 2024
Nurse Protest; राज्यातल्या परिचारिका विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर काम बंद आंदोलन करत आहेत

कशी झाली या दिवसाची सुरूवात

प्रसिद्ध नर्स फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. क्रिमियन युद्धादरम्यान नाइटिंगेलने जखमी लोक, सैनिकांना वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तिच्या याच कामाचे कौतुक म्हणून तिच्या जन्मदिनी हा दिवस साजरा करण्यात येतो.

नाइटिंगेलला 'द लेडी विथ द लॅम्प' असेही म्हटले जाते. कारण ती जखमी सैनिकांवर रात्रीच्या अंधारात दिवा लावून उपचार करत असे. तिच्या उपचारांमुळे शेकडो सैनिक बरे झाले. तिने महिलाही नर्स होऊ शकतात. आणि पुरूषांपेक्षा अधिक रूग्णांची काळजी महिला घेऊ शकतात, असे तिने त्या काळात सिद्ध केले.  

International Nurses day 2024
Taiwan Nurses : भूकंपामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं बाळांचं रक्षण; तैवानच्या रुग्णालयातील 'हिरकण्यां'चा व्हिडिओ व्हायरल

ICN ने काय ठरवलीय यंदाची थिम?

इंटरनॅशनल काँन्सिल ऑफ नर्सेस (ICN) ने 1974 पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याबाबत जाहीर केले होते. ICN दरवर्षी परिचारिका दिनासाठी एक थीम सेट करते. या वर्षाची म्हणजे 2024 ची थीम Our Nurses. Our Future. The economic power of care आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.