International Self Care Day 2024
International Self Care Day 2024Sakal

International Self Care Day 2024: 'ही' लक्षणे दिसल्यास स्वत:ची काळजी घ्या, अन्यथा गंभीर आजारांना जावे लागेल समोर

International Self Care Day 2024: स्वत:ची काळजी घेणे म्हणजे स्वार्थी असणे असे नाही तर आरोग्याकडे लक्ष घेणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक शारीरीक आजारांना सामोरे जावे लागणार आहे.
Published on

International Self Care Day 2024: दरवर्षी २४ जुलैला आंतरराष्ट्रीय स्व-काळजी दिन साजरा केला जातो. निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असते. जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हालाही पुढील गोष्टींंचा त्रास होत असेल तर स्वत:ची काळजी घ्यायला सुरूवात करावी लागेल.

पुढील लक्षणे दिसल्यास घ्यावी लागेल स्वत:ची काळजी

सतत थकवा जाणवणे

तुम्हाला पुरेशी झोप घेऊन देखील थकवा जाणवत असेल तर स्वत:कडे लक्ष देणे गरजेचे आहे. शांत आणि पुरेशी झोप हवी असेल तर ध्यान करावे आणि नियमितपणे योगासंनाचा सराव करावा.

चिडचिडपणा वाढणे

काही वेळाने चिडचिड होणे खूप सामान्य आहे. परंतु जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीवर जास्त चिडचिड करत असाल तर ते भावनिक थकवाचे लक्षण असू शकते, ज्याचा अर्थ भावनिकरित्या थकल्यासारखे वाटणे.

नकारात्मक विचार येणे

जर तुम्हाला तुमच्याबद्दल नकारात्मक विचार येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे मानसिक आजारांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी सकारात्मक राहण्यासाठी चांगल्या लोकांसोबत राहावे,नातेवाईकांसोबत वेळ घालवावा.

International Self Care Day 2024
Self Care Tips: तुम्हाला 'या' सोप्या अन् आरोग्यदायी सवयी देतील दिर्घायुष्य

भूक न लागणे

अनेकांना भूक कमी लागते. अचानक जेवण कमी झाले असेल तर आरोग्याकडे लक्ष द्यावे. कारण पुरेसे पोषक पदार्थांचे सेवन न केल्यास आजार उद्भवू शकतात. यामुळे आहारात फळ, कडधान्य यासारख्या पदार्थांचे सेवन करावे.

सामाजापासून दूर राहणे

एकटे राहणे चांगले असते पण कायम कुटूंब आणि समाजातील लोकांपासून संवाद साधणे टाळाणे चांगले नाही. यामुळे एकटेपणा वाढून नैराश्य वाढू शकते. स्वत:ला मानसिकरित्या निरोगी ठेवण्यासाठी कुटूंब आणि मित्रासोबत वेळ घालवावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.