International Tea Day 2024 : चहा करतांना 'या' गोष्टी टाळा; आपोआप चहाची चव वाढेल

International Tea Day 2024 : चहाच्या आनंददायी चव आणि सुगंधाने आपला दिवस सुरू करण्याचा दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही.
International Tea Day 2024
International Tea Day 2024 Esakal
Updated on

International Tea Day 2024 : भारतीयांचं आवडतं पेय म्हणजे चहा, बरेच लोकं आपल्या दिवसाची सुरुवात चहानेच करतात आणि लोकांचा असा विश्वास आहे की, जर त्यांना सकाळचा चहा चांगला मिळाला, तर त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. तर काही लोकांना काम करताना देखील मध्येमध्ये चहा पिण्याची सवय असते. 

आता बघू या लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चहाचा पहिला कप जन्माला कसा आला?

चहाच्या आनंददायी चव आणि सुगंधाने आपला दिवस सुरू करण्याचा दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. 4000 वर्षांपूर्वी चीनमध्ये सम्राट नन शेन यांनी चहाचा शोध लावला होता, अशी आख्यायिका आहे. एका दुर्गम प्रदेशात त्याच्या भेटीदरम्यान, त्याच्या सेवकांनी आगीवर ठेवलेल्या उकळत्या पाण्याच्या भांड्यात जवळच्या झाडाची पाने उकलळी. ताजेतवाने सुगंधाने सम्राटला पेय चाखण्यासाठी आमंत्रित केले आणि चहाचा पहिला कप जन्माला आला.

International Tea Day 2024
Winter Health Tips: हिवाळ्यात गोड आंबट बोर खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

खरं तर बर्‍याच प्रकारचे चहा बनवले जातात आणि प्रत्येक चहामध्ये तो बनवण्याचा एक खास मार्ग असतो. ग्रीन टी, ब्लॅक टी, ओलॉन्ग टी, माचा चहा, हर्बल टी, व्हाइट टी, ब्लेंड्स टी अशा वेगवेळा चहा असतात. 

International Tea Day 2024
Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी गूळ पापडी कशी तयार करायची?

1) चहा बनवताना बर्‍याचदा लोकं चुका करतात, ज्यामुळे चहाची चव बदलते. बरेच लोकं आधी दूध घेतात त्याला गरम करतात आणि मग त्यात पाणी, दुसरे पदार्थ टाकून त्याला उकळतात हे असे करणे टाळा.

2) गरम दुधात पाणी घालून पुन्हा एकदा आपल्याला बर्‍याच काळासाठी दूध उकळावे लागेल आणि ते दुधाला वाया घालवते आणि जास्त गॅस दोखील वाया जातो.

3) बरेच लोकं चहा पावडर सगळ्यात शेवटी घालतात. ही देखील एक चुकीची पद्धत आहे.

4) चहा पावडरला चांगलं उकळं गेलं पाहिजे, यामुळे तुम्हाला कमी चहा पावडर टाकून देखील चांगली चव आणि सुगंध दोन्ही मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()