International Tea Day : चहाचा शोध कसा लागला माहित आहे का? जाणून घ्या

#InternationalTeaDay : असा लागला चहाचा शोध
international tea day
international tea day
Updated on

चहा...हे नाव जरी घेतलं तरी आपोआप अंगात तरतरी येते. चहा म्हणजे अनेकांचं पहिलं प्रेम, मित्रांच्या गप्पांमधील साथीदार, चिंब पावसात भिजल्यावर उबदारपणा देणारा सोबती असं चहाचं करावं तेवढं वर्णन कमी आहे. जगाच्या पाठीवर चहाप्रेमी म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर Tea lover असंख्य आहेत.

काही जण असेही आहेत, जे दिवसातून ७-८ वेळा सहज चहा पिऊ शकतात. अशाच चहाप्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण, आज International Tea Day आहे. परंतु, सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा कोणत्याही वेळी चहा घेण्यास एका पायावर तयार असणाऱ्या या चहाप्रेमींनी या चहाचा शोध कसा लागला ते माहित आहे का? (International Tea Day this is how tea founded history of tea)

international tea day
Veg - Non veg; रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ

खरं तर गेल्या कित्येक काळापासून चहा हे ब्रिटिशांचं पेय असल्याचं म्हटलं जातं. मात्र, प्रत्यक्षात तसं अजिबात नाही. चहाचा इतिहास नीट पाहिला तर त्याचं मूळ प्राचीन चीनशी जोडलं जातं. असं म्हटलं जातं, ख्रिस्तपूर्व ३० वं शतक ते ख्रिस्तपूर्व २१ वं शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागला.

ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये शेन नुंग या तत्कालीन सम्राटाचा सत्तेवरुन पाय उतार करण्यात आला होता. त्याला दक्षिण चीनच्या दुर्गम भागात एकांतवासात ठेवलं होतं. तो अतिशय कफल्लक अवस्थेत होता.

एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पानं पडली. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला, चवही बदलली. सम्राटाला त्या पाण्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चवही इतकी आवडली की त्या काळात त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी प्यायचा सपाटाच लावला.

त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या त्या परिसरात चहाच्या रोपांचा शोध घेतला. सातत्याने चहा प्यायल्याने त्याचा पोटदुखीचा आजार बरा झाला असा प्रचार करत तो देशभर फिरू लागला. त्यातून आजच्या चहाचा जन्म झाला असं मानलं जातं. नंतर चीनमधून चहाची लोकप्रियता जगभर पसरत गेली.

दरम्यान, चहाच्या क्षेत्रातील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरु केली आणि तेव्हा भारताला चहाची खरी ओळख झाली. सुरुवातीच्या काळात भारतात चहा फक्त औषध म्हणून घेतला जात होता. ब्रिटिशांनी आसामच्या खोऱ्यात आणि दार्जिलिंगच्या डोंगरांमध्ये चहाची लागवड सुरू केली. १४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतात चहाचं उत्पादन जोर धरू लागलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.