International Yoga Day : जाणून घ्या पंतप्रधान मोदी कुठे साजरा करणार योगा डे

नंतर, पंतप्रधान बेंगळुरूमधील विविध प्रकल्पांचे लोकार्पण करतील, ज्यात बेयप्पानहल्ली येथे भारतातील पहिल्या वातानुकूलित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, उप-शहरी रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी यांचा समावेश आहे.
narendra modi
narendra modigoogle
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. सरकारने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, मोदी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि मैसूरमधील नियोजित जागतिक योग दिन कार्यक्रमात सहभागी होतील.

narendra modi
आंतरराष्ट्रीय योग दिन : व्यग्र दिनक्रमातून अशी काढा योगासाठी ४० मिनिटे

ज्या परिसरात पंतप्रधान विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत अशा शैक्षणिक संस्थांना राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही सर्व संलग्न महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी, मोदी येलाहंका एअरफोर्स बेसवर उतरतील आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जातील जेथे मेंदू संशोधन केंद्र आणि सुपर कॉम्प्युटिंग सुविधेचे उद्घाटन केले जाईल.

बागची पार्थसारथी रुग्णालयाची पायाभरणीही ते करणार आहेत. त्यानंतर डॉ बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि उद्घाटन करण्यासाठी ते ज्ञानभारती कॅम्पसमध्ये जातील. एकूण १५० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा समावेश (ITIs) असलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी (BASE) सुरू केली जाणार आहे.

नंतर, पंतप्रधान बेंगळुरूमधील विविध प्रकल्पांचे लोकार्पण करतील, ज्यात बेयप्पानहल्ली येथे भारतातील पहिल्या वातानुकूलित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, उप-शहरी रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी यांचा समावेश आहे. आणि कर्नाटकातील ७ हजार २३१ कोटी रुपयांचे सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एक मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्प. जाहीर रॅलीही काढण्यात येणार आहे.

त्यानंतर मोदी म्हैसूरला रवाना होतील आणि महाराजा कॉलेज मैदानावर नागनहल्ली आणि म्हैसूर येथे उभारल्या जाणाऱ्या नवीन कोचिंग कॉम्प्लेक्सची पायाभरणी करतील. त्यानंतर, ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (AIISH) मधील सेंटर ऑफ एक्सलन्स राष्ट्राला समर्पित करतील.

पंतप्रधानांच्या हस्ते सुत्तूर मठ येथे वेद पाठशाळेच्या इमारतीचे उद्घाटन केले जाईल, ते मठात योग आणि भक्ती यावर भाष्य देखील प्रसिद्ध करतील. पंतप्रधान चामुंडी हिल्सवरील श्री चामुंडेश्वरी मंदिराला भेट देतील आणि म्हैसूरमध्ये मुक्काम करतील. मंगळवारी ते आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी होतील आणि त्याच दिवशी सकाळी नवी दिल्लीला रवाना होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.